नाशिक

गरुड बंधू, हिंगोणेकरांची दिवाळी कारागृहातच

CD
गरुड बंधू, हिंगोणेकरांची दिवाळी कारागृहातच --- शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण : जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २८ : राज्यभर गाजत असलेल्या १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शेंदुर्णी (ता. जामनेर) शिक्षण संस्थेचा अध्यक्ष संजय गरुड, सहसचिव दीपक गरुड, तसेच जळगावचा माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांचा जामीन अर्ज नाशिक रोडचे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केदार जोशी यांनी फेटाळून लावला. गरुड बंधू जुलै महिन्यापासून नाशिक रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. गरुड बंधूंसह हिंगोणेकर या तिघांची दिवाळी कारागृहात साजरी होणार आहे. खानदेशातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या जामनेरच्या शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष संजय गरुड यास २७ जुलैला सोलापूर जिल्ह्यातून नाशिक शहर गुन्हे शाखेने अटक केली होती. याच संस्थेचा सहसचिव व संजय गरुडचा भाऊ दीपकलाही अटक करण्यात आली. दोघांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. गरुड बंधुंच्या जामिनावर युक्तिवाद होऊन त्यावरील सुनावणी बुधवारी (ता. २८) झाली. नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केदार जोशी यांनी गरुड बंधूंचे जामीन अर्ज फेटाळून लावले. बनावट शालार्थ आयडीमध्ये सर्वाधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जळगाव जिल्ह्यातील असून, यात लक्षणीय प्रमाण हे गरुड यांच्या शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे आहेत. याच मुद्द्यावर सरकार पक्षातर्फे गरुड बंधुंच्या जामिनाला कडाडून विरोध करण्यात आला होता. बचाव पक्षाने गरुड बंधूंचे वय आणि त्यांना असलेल्या आरोग्याच्या तक्रारींची कारणे देत जामिनाची मागणी केली होती, परंतु न्यायाधीश जोशी यांनी दोघांचेही जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. यामुळे त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. शालार्थ आयडी प्रकरणी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तपासकामी दोन सहायक आयुक्त सचिन बारी व संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली पथके नेमली आहेत. या पथकांकडून उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगावमधील शाळांची झाडाझडती सुरू आहे. तर गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयानेही फेटाळून लावले आहेत. यातील काही संशयित शिक्षणाधिकारी पसार असून, त्याचा शहर गुन्हे शाखेची पथके कसून शोध घेत आहेत. १६-१ हिंगोणेकरला दिलासा नाही जळगावचे निवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याचाही जामीन अर्ज नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. हिंगोणेकर यांच्याच कार्यकाळात सर्वाधिक शालार्थ आयडीचे वाटप करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. ६५ वर्षीय हिंगोणेकर यांनी जामिनासाठी धाव घेतली, परंतु न्यायालयाने फेटाळून लावत त्यांनाही दणका दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT