Lord Gaurangadas Jayesh Sanghvi inaugurating Rotary Club's conference on Saturday at Grape County on Trimbak Road. Neighbor Asha Venugopal, Pubudu District. Zoysa, Kishore Kedia, Shabbir Shakir, Jayant Khairnar etc. esakal
नाशिक

Nashik News : रामलल्‍लाच्‍या मंदिरातून सकारात्‍मक संदेश : गौरांगदास प्रभु

प्रभु श्रीराम व त्यांच्‍या बंधूंचे कार्य सेवेला प्रवृत्त करणारे असून, सामाजिक क्षेत्रात वावरतांना त्‍यांची प्रेरणा घेतली पाहिजे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : प्रभु श्रीराम व त्यांच्‍या बंधूंचे कार्य सेवेला प्रवृत्त करणारे असून, सामाजिक क्षेत्रात वावरतांना त्‍यांची प्रेरणा घेतली पाहिजे. श्रीराम सेवेचा श्रेष्ठ आदर्श असून लक्ष्मणाकडे सेवारुपी‌ लक्ष्मी होती. भरत सहनशीलता,‌ सहिष्णुता शिकवतो.

शत्रुघ्न नम्रतापूर्वक आशेचा दीप जागवतो. रोटरी सदस्‍यांनी हे गुण आत्मसात करताना सेवेचा यज्ञ‌‌‌ धगधगता ठेवावा. (Gauranga Das Prabhu statement of Positive Message from Ram Lalla Temple nashik news)

अयोध्येत रामलल्लाचे मंदिर उभे राहत असून २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत आहे. या मंदिरातून जगभरात भारताविषयी सकारात्मक संदेश‌ जाईल. असे प्रतिपादन इस्कॉनचे प्रमुख गौरांगदास प्रभू यांनी शनिवारी (ता.६) केले.

रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचा रोटरी क्‍लबच्‍या 'आशाए... ए कार्निवल ऑफ होप' या परिषद व मेळाव्‍याच्‍या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. त्र्यंबकरोडवरील हॉटेल ग्रेप काउंटी येथे हा मेळावा होतो आहे. याप्रसंगी रोटरी इंटरनॅशनल प्रतिनिधी पुबूडू झोयसा (श्रीलंका) तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले.

जयंती सावित्री यांनी गणेशवंदना सादर केली. माजी अध्यक्ष जयेश संघवी यांनी प्रास्ताविक केले.‌ अध्यक्ष जयंत खैरनार यांनी रिजन ३०३० च्या प्रतिनिधिनींचे स्वागत केले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या गव्हर्नर आशा वेणुगोपाल यांनी स्वागतपर भाषणात परिषद, मेळाव्याचा‌ उद्देश सांगत दहा वर्षांनंतर नाशिकमध्ये होणाऱ्या मेळाव्यात अठराशे प्रतिनिधी सहभागी झाले असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली. सुरुची रणदिवे यांनी संपादित केलेल्या मासिकाचे प्रकाशन यावेळी झाले. टॉबी भगवागर यांनी संयोजन केले. सतीश व मितू मांडोरा यांनी सूत्रसंचालन केले.

पुरस्‍कारांनी सदस्‍यांचा गौरव

सर्वोच्च सेवा पुरस्कार शब्बीर शाकिर (नागपूर), राम गवांदे पुरस्कार देवेश भगत (खामगाव), एडुल पुरस्कार राजेश व्यवहारे (नागपूर) यांना देऊन गौरविण्यात आले.

ग्रामीण भागात उद्योजकतेवर भर देत यशस्‍वी व्हा : शर्मा

सध्याचे केंद्र सरकार हे भारतातील नागरिकांनासाठी विविध कल्‍याणकारी योजना राबवत आहेत. लोकप्रतिनिधी व ग्रामस्‍थांनी ठरविले तर कशा प्रकारे विकास साधता येऊ शकतो हे आमच्‍या गावाने सिद्ध करून दाखविले आहे. महिलांनीदेखील मागे न राहाता, ग्रामीण भागाकडे वळत उद्योजकतेतून यशस्‍वी व्‍हावे, असे मत सरपंच भक्‍ती शर्मा यांनी व्‍यक्‍त केले.

सत्रातून मान्‍यवरांचे मार्गदर्शन

''मेजर जनरल संजयकुमार विद्यार्थी, आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश, नर्मदा प्रकल्पाच्या प्रमुख भारती ठाकूर व इतर मान्‍यवरांनी दिवसभर चाललेल्‍या सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. संजयकुमार विद्यार्थी म्हणाले, की रोटेरियन्स वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी आपल्या अनुभवांचा, सत्ता व संपत्तीचा‌ उपयोग राष्ट्र उन्नतीसाठी करावा.

कृष्ण प्रकाश म्हणाले, सेवाक्षेत्रात कार्य करणे आपण निवडले आहे. त्यात‌ पूर्णपणे झोकून देताना शंभर टक्‍के काम करावे. भारती ठाकूर यांनी नर्मदा परिक्रमा व मध्यप्रदेशातील लेपा येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे अनुभव सांगितला.''

अनुपम खेर, अग्‍निहोत्रींच्‍या उपस्‍थितीत आज समारोप

परिषदेच्‍या दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.७) अभिनेते अनुपम खेर, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री मार्गदर्शन करतील. तसेच उद्योजक पियुष सोमाणी, पल्लवी उटगी आदींचे सत्र होईल. सायंकाळी समारोप होणार असून तत्‍पूर्वी विविध परिसंवाद होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT