Women residents of Hamalwada welcoming and congratulating Gaurav Kadam on his selection as Sub Inspector of Police.  esakal
नाशिक

Nashik Success Story: जिद्द चिकाटीच्या जोरावर नांदगावच्या गौरवची पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी

पोलिस उपनिरीक्षक भरतीचा निकाल गुरूवारी (ता.२८) जाहीर झाला. त्यात गौरवने यश मिळाल्याचे समजाताच परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Success Story: जिद्द, मेहनत, चिकाटी असेल तर यश निश्‍चित मिळते. नांदगाव शहरातील हमालवाडा भागातील दूरसंचार विभागातील कामगाराचा मुलगा असलेल्या गौरव कदमची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.

जिद्द, मेहनतीने मिळालेल्या या त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Gaurav Kadam was selected as Sub Inspector of Police nashik news)

पोलिस उपनिरीक्षक भरतीचा निकाल गुरूवारी (ता.२८) जाहीर झाला. त्यात गौरवने यश मिळाल्याचे समजाताच परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कुटुंबात पहिलाच पोलिस अधिकारी होण्याचा मान त्याला मिळाला आहे. गौरवचे प्राथमिक शिक्षण नगरपालिका शाळेत तर माध्यमिक शिक्षण येथील व्ही.जे स्कूलमध्ये झाले.

महाविद्यालयीन शिक्षण नांदगावच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात पूर्ण केले. पदवीसाठी नाशिक येथे प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत विज्ञान विषयाची पदवी मिळविला. बाहेर काम करत त्याने कोणताही क्‍लास न लावता दिवसाला पाच ते सहा तास रविवारी संपूर्ण दिवस मुद्देसूद अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यशाला गवसणी घातली.

त्याचे यश पाहून आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. नांदगांव येथील दूरसंचार विभागात अल्पमजुरीवर काम करणाऱ्या सुरेश गणपत कदम यांचे ते पुत्र आहेत. गरीब कुटुंबातील तरुण पोलिस उपनिरीक्षक झाल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. गौरवचा हमालवाडा येथील रहिवासी व मल्हारवाडी येथे श्रीराम जनसेवा मोफत वाचनालयात अध्यक्ष रवी सोनवणे यांनी नागरी सत्कार केला.

"आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न मी पाहिले होते. ते सत्यात उतरवण्यासाठी मी प्रयत्न केले. आज त्यांच्या कष्टाचे चीज झाले. मोठा भाऊ व नातेवाईक व मित्रमंडळींनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर अशक्य काहीच नाही." - गौरव कदम, नूतन पोलिस उपनिरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Nanded Dasara: नांदेडमध्ये दसरा महोत्सव उत्साहात; हल्ला-महल्ला मिरवणुकीत हजारो शीख भाविकांचा सहभाग

Pune Crime : टीव्ही बंद करायला सांगितला म्हणून केली वडिलांची हत्या; ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेने कोथरुड मध्ये खळबळ

Teacher Recruitment: मराठवाड्यात शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! ४५७ समन्वयक पदांसाठी ऑनलाइन परीक्षा १ ते ५ डिसेंबर

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; आता E-kyc केलेल्या बहिणींनाच मिळणार लाभ, दिवाळीतील हप्ता पडणार लांबणीवर

SCROLL FOR NEXT