धुळे : टुडे पान २ साठी...
--
फोटो क्रमांक : 34701
धुळे : कुस्तीपटू गौरी लोखंडेचा सत्कार करताना गजेंद्र अंपळकर, सतीष अंपळकर. शेजारी मान्यवर.
--
कुस्तीपटू गौरी लोखंडेचा
भाजप कार्यालयात सत्कार
--
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ७ : दिल्ली येथे झालेल्या ७० व्या नॅशनल स्कूल गेम्स २०२७ राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत धुळे शहराच्या गौरी सतीश लोखंडे हिने क्रीडाकौशल्य दाखवत सुवर्णपदक पटकावले. तिने अंडर- १५ वयोगटातील ३९ किलो वजन गटात देशभरातील प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत हे यश संपादन केले. तिच्या या कामगिरीबद्दल महादेव अंपळकर भाजपा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष तथा हरहर महादेव विजय व्यायामशाळेचे संस्थापक गजेंद्र अंपळकर, व्यायामशाळेचे अध्यक्ष सतीष अंपळकर यांच्या हस्ते गौरीचा सत्कार करण्यात आला.
-
हरहर महादेव विजय व्यायामशाळेच्या क्रीडा संस्कारांचा हा राष्ट्रीय स्तरावरील गौरव असल्याचे या वेळी मान्यवरांनी सांगितले. एसएआई प्रशिक्षक वरुण त्यागी, प्रशिक्षक संजय पाटील, संजय गिरी, नरेश हिरे, इकबाल पटेल, नरेंद्र गवळी यांचे मार्गदर्शन गौरीला झाले. या सत्कार सोहळ्याप्रसंगी ईश्वर लाडे, यशवंत येवलेकर, प्रकाश उबाळे, सुहास अंपळकर, मार्शल लाडे, गणेश लाडे, सतिष लोखंडे, पंकज गवळी, अनिल खैरनार, मनिष तिवारी, योगेश पावरा, महेश बडगुजर, भिका गवळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.