Kinner welcoming Gauri at home esakal
नाशिक

Gauri Pujan 2022 : किन्नरांच्या घरी महालक्ष्मी विराजमान!

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : शहरात अनेक घरात थाटामाटात उत्साहाने माहेरवाशिण असणा-या लाडक्या गौराईचे आगमन झाले. विविध कल्पकता वापरून फळे, फुले व सुशोभिकरनाने आकर्षक आरास करून स्थान देण्यात आले. पाटावर चादर अंथरूण त्यावर तांदळाची रास ठेवून लक्ष्मीच्या रूपाने आलेल्या गौरींचे स्वागत उत्साहात झाले. दरम्यान येथे आज किन्नरांच्या घरी महालक्ष्मी विराजमान झाल्या. आराधी, जोगती, किन्नर यांनी मोठ्या थाटामाटात महालक्ष्मीची स्थापना केली. (Gauri Pujan 2022 Mahalakshmi sthapana in Kinner house in sinnar nashik Latest Marathi News)

यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होत असल्याने उत्साहाचे वातावरण सर्वत्र दिसून येत असून ज्येष्ठा गौरी महालक्ष्मी माता मुलाबाळांसह तीन दिवसांसाठी माहेरी येते. आज गौरीची घरोघरी स्थापना झाली असून आज किन्नर, आराधी, जोगती या कुटुंबाने मोठ्या थाटामाटात आपल्या घरी महालक्ष्मीची स्थापना केली आहे. गेल्या ५ वर्षांपासून हे कुटुंब महालक्ष्मीची स्थापना करते. आकर्षक आरस सजावट करत महालक्ष्मीची स्थापना केल्यानंतर पूजाअर्चा व आरती केली.

बाप्पापाठोपाठ आली आली गौराई, सोनरूपाच्या पावलानं, आली आली गौराई, धन धान्याच्या पावलानं, असे म्हणत सोनपावलांनी माहेरवाशीण ज्येष्ठा गौरींचे घरोघरी आगमन झाले. शहरात ४०० ते ५०० कुटुंबांमध्ये महिला वर्षानुवर्ष गौरीची स्थापना करतात. गणपती मांगल्याचे तर महालक्ष्मी समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. तिच्या प्रतिष्ठापनेनंतर घरामध्ये मांगल्य, सुख, समृद्धी, आनंद टिकून राहतो, अशी भाविकांची भावना आहे.

माहेरवाशीण असलेल्या गौराई अनेक ठिकाणी पिढ्यांपिढ्या बसवल्या जातात. काही ठिकाणी भक्तिभावाने तर काही घरी नवसाच्या म्हणून बसवल्या जातात. काही ठिकाणी पितळेचे तर काही ठिकाणी मातीचे मुखवटे असलेल्या, खड्यांच्या रुपातही गौरी बसविल्या जातात. उद्या (ता.४) रविवारी गौरीपूजन व हळदिकुंकूवाचा महिलांचा कार्यक्रम असून व तिसऱ्या दिवशी सोमवारी गौराईचे भावभक्तीने विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे.

गौरीपुढे विविध प्रकारचे पदार्थ मांडले जातात. गौरीच्या इतर सजावटीला गोड, तिखट पदार्थांची सुंदर चव देण्याचाही विशेष प्रयत्न केला जातो. हा गौरीसाठीचा फराळ किमान चांगला व्हावा, फराळाच्या मांडणीत भरपूर पदार्थ असावेत यासाठी महिला वर्ग काळजी घेतो. त्यामुळेच घरोघरी पदार्थ तयार करण्याची लगबग सुरू होती.

काही ठिकाणी गौरींचे मुखवटे तयार करून त्याचे पूजन झाले. विविध वेली, आकर्षक फूल, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, नथ आदी आभूषणे घालून तिची पूजा झाली. महिलांनी घरात तांबड्या मातीचे पट्टे ओढून त्यावर तांदळाच्या पिठाने गौरींची पावले उमटवली.दरम्या येथील कुणाल दराडे फाउंडेशनतर्फे रविवारी गौरी सजावट स्पर्धेचेही आयोजन केले असून विजेत्या महिलांना पैठणीचे बक्षिसे दिली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT