नाशिक

घरफोडीत ७० हजारांचा मुद्देमाल लंपास

CD
अवतीभवती --- गौतमनगरला घरफोडी; हजारांचा मुद्देमाल लंपास नंदुरबार : घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातून ७० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना येथील गौतमनगर भागात घडली. याप्रकरणी नंदुरबार पोलिसांत चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुनीता सुनील खंडारे (रा. गौतमनगर) यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने बेडरूममधील कपाटातून सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. त्यात ६ ग्रॅमचे टोंगल, ५ ग्रॅमची अंगठी, दीड ग्रॅमच्या रिंगा, ५ ग्रॅमची अंगठी, अर्ध्या ग्रॅम नथनी, सोन्याच्या तीन फुल्या, चांदीचे आठ भार कडे, २.५ ग्रॅमची चांदीची साखळी, दोन भार वजनाचे चांदीचे ब्रासलेट असा एकूण ६९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. पोलिस हवालदार दिलीप साळवे तपास करीत आहेत. --- आयशरच्या धडकेत एक ठार, नंदुरबार : आयशर वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील एक जण ठार झाला. अक्कलकुवा तालुक्यातील राजमोही फाट्यावर हा अपघात घडला. याप्रकरणी अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हेमंतभाई कांतिलालभाई वळवी ( वय २७, रा. बेज, ता. कुकरमुंडा), अजबसिंग गोमू प्रधान (वय ४५, रा. बेज, ता. कुकरमुंडा) आणि हितेशभाई हिरालाल प्रधान (वय २५) हे बेज येथून मोटारसायकलीने (जीजे २६, एल ९७८१) कपडे घेण्यासाठी अक्कलकुवा येथे जात होते. त्या वेळी राजमोही फाट्याजवळ तळोदाकडून येणाऱ्या आयशर ने मोटारसायकलीला जोरात धडक दिली. फिर्यादी व त्यांचे मित्र खाली पडल्याने जखमी झाले, तर मोटारसायकलवर मागे बसलेले अजबसिंग प्रधान यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतील आयशर वाहनाची ओळख पटू शकली नाही. पोलिस हवालदार कृष्णा गावित तपास करीत आहेत. --- जुन्या भांडणाच्या वादातून मारहाण नंदुरबार : जुन्या भांडणाच्या वादातून एकास मारहाण करण्यात आली. नवापूर शहरातील मार्केट कमिटीसमोरील शॉपिंगमधील एका ऑटो गॅरेजमध्ये ही घडली. याप्रकरणी नवापूर पोलिसांत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र श्‍यामसिंग गिरासे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेश मनोज गोसावी (रा. तीनटेंबा, ता. नवापूर) हे ऑटो गॅरेजमध्ये काम करीत असताना जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी पाइप व फावडाने मारहाण करण्यात आली. तसेच ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी मुकेश बाबू गोसावी, पिंटू उर्फ कमलेश सुभाष गोसावी, सुभाष गोसावी व इतर सर्व (रा. धडधड्या, नवापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित अहिरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

Spine Surgery: जन्माची वाट न पाहता आईच्या गर्भातच बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; AIIMSच्या डॉक्टरांनी रचला इतिहास

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

Latest Marathi News Update : मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानातील सुरक्षारक्षकांना मारहाण प्रकरण; न्यायालयाकडून तिन्ही आरोपींना जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT