नाशिक

गवळवाडी पर्यायी मार्गासाठी प्रत्यक्ष पाहाणी

CD
फोटो : H34708 गवळवाडी पर्यायी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी होणार जिल्हाधिकारी प्रसाद यांचे आदेश; सरकारला अहवाल होणार सादर स सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : बहुचर्चित परिक्रमा मार्ग (बाह्य रिंगरोड) प्रकल्पात मखमलाबाद- गोवर्धन- विंचूर गवळी अलाइनमेंटला पर्याय म्हणून गवळवाडी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रत्यक्ष पाहणीबाबत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ ाला (एमएसआयडीसी) आदेश दिले आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतरचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार असल्याचा दावा बाधित शेतकऱ्यांनी केला. रिंगरोड प्रकल्पात मखमलाबाद ते गोवर्धन आणि विंचूर गवळी या परिसरातील शेतकऱ्यांचा प्रस्तावित अलाइनमेंटला सातत्याने विरोध आहे. शेतकऱ्यांच्या घरे, विहिरी, बोअरवेलचे तसेच सुपीक जमिनींचे नुकसान टाळण्यासाठी गवळवाडीचा पर्यायी मार्ग व्यवहार्य असल्याची शेतकऱ्यांची भूमिका आहे. या संदर्भात बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची वारंवार भेट घेत चर्चाही केली. याच मागणीला प्रतिसाद देत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांना गवळवाडी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करत उपलब्ध पर्यायांचा तांत्रिक अभ्यास करावा. तसेच त्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादरीकरणाच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चर्चेप्रसंगी दीपक हगवणे, सुदर्शन पाटील, पंकज खताळे, भारत पिंगळे तसेच रिंगरोड बाधित शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. --- चौकट वाढीव मोबदला द्यावा : गायकर अंतिम निवाडे जाहीर झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांना २५ टक्के वाढीव मोबदल्याचा लाभ देण्यात यावा. तसेच सर्व गावांतील सर्वोच्च खरेदीखतांचे दर विचारात घेत जिरायत, हंगामी बागायत आणि बागायत जमिनींचे नव्याने सर्वेक्षणाचे निर्देश देण्यात आले आहेत. या फेरसर्वेक्षणाचा आधार घेत सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय्य व वाढीव मोबदल्यासाठी पुरवणी निवाडा जाहीर करण्यात यावा, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update: नालासोपाऱ्यात आगीच्या तांडव; दोन गाड्या जळून खाक

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

SCROLL FOR NEXT