नाशिक

‘गंधार’तर्फे रंगला अक्षरगप्पांचा कार्यक्रम

CD
ॲंकर ------------ NSK26H31148 जळगाव : गंधार कला मंडळातर्फे आयोजित ‘एक होते गदिमा’ या विषयावरील अक्षर गप्पांच्या कार्यक्रमात सहभागी काव्य व साहित्यप्रेमी. ------ ‘एक होते गदिमा’ कार्यक्रमात स्मृतींना उजाळा ---------- गंधार कला मंडळातर्फे काव्य, गीतांद्वारे रंगला अक्षरगप्पांचा कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २ : येथील गंधार कला मंडळातर्फे ‘एक होते गदिमा’ हा अक्षरगप्पांचा कार्यक्रम नुकताच झाला. यात साहित्यप्रेमींनी ग. दि. माडगुळकर यांच्या कविता, गाणी सादर केली. त्यानंतरही उत्तरोत्तर हा कार्यक्रम रंगत गेला. या कार्यक्रमात तुला पाहते रे, एक धागा सुखाचा, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख अशा अनेक रचना गदिमांच्या शब्दांच्या पेरणीत अमर झाल्या. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यांसह गदिमांचे अनेक पैलू गंधार कला मंडळातर्फे झालेल्या अक्षरगप्पात उलगडले. कार्यक्रमाची सुरवात नीळकंठ कासार यांनी गायलेल्या ‘गा बाळांनो गीतरामायण’ या गिताने झाली, तर गदिमा रचित राम कथा म्हणजे नवरसांचा कधीही न आटणारा झरा आहे, असे दीपा देशपांडे यांनी सांगितले. आसावरी जोशी यांनी त्यांच्या बालगीत, लावणी, प्रेम गीत व इतर गितांचे सौंदर्य स्पष्ट केले. नरेंद्र पाटील यांनी गदिमांचे चित्र साकारून त्यांना आदरांजली वाहिली. वसुधा राजहंस यांनी त्यांचा जीवन परिचय, मिनल कुलकर्णी यांनी गदिमांची लेखन शैली कथन केली. सूत्रसंचालन विशाखा देशमुख यांनी केले. १४-१ यांचा होता सहभाग या अक्षरगप्पांत प्रकाश पाटील, मनीषा पापरीकर, मीना बियाणी, सुचेता नेवे, शरद पांडे, वरदा देशमुख, गोविंद बावने, स्वरा पाठक, नेत्रा सोनार, अविनाश चंद्रात्रे, उमेश कुलकर्णी, विलास देशमुख, पानाचंद चौधरी यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT