general elections of manmad municipal are likely to be held by the end of march
general elections of manmad municipal are likely to be held by the end of march  sakal
नाशिक

मनमाड पालिकेवर प्रशासक की मुदतवाढ? राजकीय वर्तुळाचे लक्ष

अमोल खरे

मनमाड (जि. नाशिक) : मनमाड पालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ या वर्षअखेरीस म्हणजेच डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यात संपणार आहे. मात्र, तत्पूर्वी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे विद्यमान सभागृहाची मुदत संपल्यानंतर पालिकेवर प्रशासक नियुक्त होतो की मुदतवाढ मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मनमाड पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका मार्चअखेरीस होतील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरू आहे. त्यातच गुलाबी थंडीची चाहूल आणि पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीने लक्ष वेधले असून, विद्यमान सभागृहाची मुदत २९ डिसेंबरला संपणार आहे. सध्या केवळ प्रारूप प्रभागरचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याबाबतचा अहवाल पाठविणे, मतदारयादी प्रसिद्ध करणे, त्यानंतर मतदारयाद्या प्रभागनिहाय फोडण्याचे काम चालणार आहे. त्यावर हरकती व सूचना मागविल्यानंतर अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जातील. दरम्यान, आरक्षण टाकण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. यासाठी किमान जानेवारी-फेब्रुवारी महिना लागण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत पालिकेची निवडणूक मुदतीत होण्याची शक्यता मावळली असून, मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, असा राजकीय तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त केला जात आहे.

पालिकेची निवडणूक प्रक्रिया मुदतीत होण्याकरिता ऑक्टोबर-नोव्हेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. कोरोना संकट, शासन धोरण यामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे सरकू शकली नाही. परिणामी, मतदारयादी तयार करणे, प्रभागनिश्‍चिती, प्रभागरचना व त्याचे आरक्षण, त्यावरील हरकती-सूचना ही प्रक्रिया अद्यापही होऊ शकली नाही. स्वाभाविक मुदतीत निवडणूकही होणे अशक्य झाले आहे. सध्या मतदारयादी बनविणे, त्याचे पुनरीक्षण ही कामे पालिका, निवडणूक विभागांच्या पातळीवर सुरू आहे. मात्र, डिसेंबरअखेर निवडणूक प्रक्रिया होण्याची शक्यता नाही. सध्या मनमाड पालिकेच्या सभागृहात थेट नगराध्यक्ष निवडून आले असून, यासह जनतेतून निवडून आलेले ३१ नगरसेवक, तर तीन स्वीकृत नगरसेवक अशा एकूण ३५ सदस्यांचे पालिका सभागृह आहे.

शासनाच्या भूमिकेकडे लक्ष

मागील पंचवार्षिक निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ ला झाली. २९ डिसेंबर २०१६ ला सभागृहाचा पदभार घेण्यात आला. त्यामुळे तब्बल पाच वर्षांनी म्हणजे २९ डिसेंबर २०२१ ला सभागृहाची मुदत संपणार आहे. मात्र, नियमानुसार सभागृहाची मुदत संपण्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक असते. कोरोना संसर्ग आणि शासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले असले, तरी मनमाड पालिकेवर प्रशासक नियुक्त होणार की मुदतवाढ मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पक्षीय बलाबल

शिवसेना - थेट नगराध्यक्षसह १८ नगरसेवक
राष्ट्रवादी - ५ नगरसेवक
काँग्रेस - ५ नगरसेवक
रिपाइं - २ नगरसेवक
अपक्ष - १ नगरसेवक
स्वीकृत - ३ नगरसेवक

प्रभागांचा आकार बदलणार

मागील पंचवार्षिक निवडणुकीत दोन नगरसेवकांचे १४, तर तीन नगरसेवकांचा एक प्रभाग असे १५ प्रभाग होते. त्यामुळे आगामी पालिकेच्या निवडणुकीत जैसे थे परिस्‍थिती राहणार की प्रभाग वाढणार, हे बघावे लागणार आहे. मात्र, प्रभागाच्या भौगोलिक सीमा काहीअंशी बदलण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांत मतदारांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे अनेक प्रभागांचे आकार कमी-जास्त होण्याची शक्यता असून, यामुळे एक प्रभाग वाढतो की आहे त्या प्रभागात आणखी दोन नगरसेवकांची भर पडण्याची शक्यता आहे, हे पाहावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: कन्हैय्या कुमार यांचा धर्मांतर करा असे सांगणारा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल, वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT