Chewable Gummies
Chewable Gummies  esakal
नाशिक

Healthy Diet: कृत्रिम घटकांपेक्षा सकस आहारातून मिळवा पोषणमूल्य! जाहिरात बघून च्युएबल गमीज खाणं टाळा..!

दीपिका वाघ

नाशिक : सोशल मीडिया, रिल्स बघताना विविध कंपन्यांच्या ‘च्युएबल गमीज’च्या जाहिराती दिसून येतात. या जाहिरातीमध्ये दावा केल्याप्रमाणे तसेच आलेल्या प्रतिक्रिया बघून अनेकजण परस्पर गमीज खायला सुरवात करतात.

पण, तज्ज्ञांच्या मते गमीज खाणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक तर आहेच, शिवाय गमीजमध्ये कंपन्यांनी दावा केल्याप्रमाणे घटक असले तरी ते सर्वांच्याच शरीराला सूट होत नाहीत. गमीज म्हणजे चॉकलेट स्वरूपात सर्व पोषणमूल्य मिळणारी च्युएबल गोळी... (Get nutritional value from healthy food rather than artificial ingredients advice by dr shraddha sonnis rahul patil nashik news)

भारतातील जवळजवळ ८२ टक्के लोकसंख्या सध्या स्ट्रेसफुल लाइफ स्टाइलमुळे त्वचा, केस, नख, झोप यांसारख्या विविध समस्यांनी त्रस्त आहे. तसेच विशीतील मुले तिशीतल्या मुलाप्रमाणे दिसायला लागली आहेत.

व्हिटॅमिन सी, डी, प्रोटिन्स, झिंक, आयर्न, हिमोग्लोबिन, फॉलिक ॲसिड यांसारखे घटक रोजच्या अन्नपदार्थातून मिळत नसल्याने ‘साइड सप्लिमेंट’ म्हणून च्युएबल गमीजचा आधार घेतला जातो. या गमीज विविध फ्लेव्हरमध्ये तयार केल्या जातात आणि त्या चॉकलेटप्रमाणे खाल्ल्या जातात.

कोट्यवधी रुपयांचे मार्केट असलेल्या या गमीज अनेकांच्या लाइफ स्टाइलचा भाग बनल्या आहेत. खासकरून तरुणांमध्ये झोप, केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात, याचाच फायदा या गमीज बनवणाऱ्या कंपन्या घेत आहेत.

वास्तविक गमीज ही पाश्चात्त्य देशातून आलेली संकल्पना आहे, जी आता भारतात रुळायला लागली आहे. लहान मूल खाण्याबाबात चुझी असतात, त्यामुळे पाश्चात्य देशात सुरवातीला लहान मुलांसाठी चॉकलेट स्वरूपात असणाऱ्या च्युएबल गमीज तयार करण्यात आल्या. त्यानंतर मोठ्या माणसांसाठीही या गमीज तयार करायला आता सुरवात झाली आहे.

बंद केल्यानंतर परिणाम नाहीसा

विविध कंपन्यांच्या या च्युएबल गमीज सोशल प्लॅटफॉर्मवर ७०० ते १५०० रुपयांपर्यंत मिळतात. यामध्ये केवळ ३० ते ६० गमीज येतात, म्हणजे एक गमीज ३० रुपयांपर्यंत मिळते. शिवाय या गमीज महिनाभर सातत्याने घेतल्या तरच त्याचा परिणाम दिसून येतो.

कालांतराने त्या बंद केल्यानंतर त्याचा परिणाम नाहीसा होतो. जाहिरात बघून गमीज खात असाल, तर ते धोकादायक ठरू शकते. कारण एखाद्या व्यक्तीत व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता नसेल आणि गमीजमधून त्याला व्हिटॅमिन बी १२ मिळत असेल तर त्याची मात्रा वाढते.

व्यक्तिपरत्वे रक्तात असणाऱ्या घटकांचे प्रमाण कमी-जास्त असते आणि रक्त तपासणीतून ते समजू शकते.

"गमीज जेलीजपासून बनविल्या जातात तसेच त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. जे पीसीओडी, मधुमेह रुग्णांसाठी धोकादायक ठरते. गमीजमध्ये जिलेटिन आल्यावर ती नॉनव्हेज होते, हे बऱ्याच जणांना माहिती नसते. गमीजमध्ये असणारे घटक आणि शरीराला आवश्यक असणारे घटक याचे परस्परविरोधी प्रमाण असल्याने गमीज खाणे टाळावे."

-डॉ. श्रद्धा सोननीस, त्वचाविकारतज्ज्ञ

"शरीराला कृत्रिम घटकांमधून पोषणमूल्य देण्यापेक्षा रोजच्या जेवणातून पोषणमूल्य मिळाल्यास ते कधीही चांगले. त्यासाठी आहारात बदल करणेच योग्य. तात्पुरत्या स्वरूपाचा उपाय करण्यापेक्षा शरीराला कायमस्वरूपी सवय लागलेली कधीही चांगली."

-डॉ. राहुल पाटील, जनरल फिजिशियन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT