home loan esakal
नाशिक

गृहकर्ज घेणे झाले महाग; ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : बँकांकडून (bank loan) कर्ज घेतेवेळी ग्राहकांना इक्विटेबल मॉर्गेज (गहाण फी) केवळ एक हजार ३०० रुपये भरावे लागत होती. आता ती कर्जाच्या अर्धा टक्का स्टॅम्प ड्यूटी स्वरूपात केली आहे. यामुळे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. या संदर्भात बांधकाम व्यावसायिकांसह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनी ही फी रद्द करावी, अशी मागणी केली आहे. (Getting-home-loan-can-be-expensive-nashik-marathi-news)

इक्विटेबल मॉर्गेज फी आता कर्जाच्या अर्धा टक्का

गृहकर्ज घेतेवेळी इक्विटेबल मॉर्गेज म्हणजेच गहाणखताची फी एक हजार ३०० रुपये भरावी लागत होती. आता ती वाढवून कर्ज घेतल्याच्या अर्धा टक्का फी भरावी लागणार आहे. जितके कर्ज असणार त्याच्या अर्धा टक्का फी भरावी लागणार असल्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला हा भुर्दंड बसणार आहे. यामुळे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसह बांधकाम व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना काळात नोकरी-व्यवसाय रोजगाराला खीळ बसली आहे. त्यातच आता इक्विटेबल मॉर्गेजच्या नावाखाली अर्धा टक्का स्टॅम्प ड्यूटी स्वरूपात चार्जेस आकारले जाणार आहेत. यामुळे घर घेणे आणखी महाग झाल्याची प्रतिक्रिया ग्राहक व बांधकाम व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.

इक्विटेबल मोर्गेजची फी आधी एक हजार ३०० रुपये होती. आता ती कर्ज रकमेच्या अर्धा टक्का व तीनशे रुपये अशी झाली आहे. याचा भुर्दंड ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. बांधकाम व्यवसायावर याचा दूरगामी परिणाम होणार आहे. राज्य शासनाने विचार करून इक्विटेबल मॉर्गेज फी पुन्हा एक हजार ३०० रुपये करावी. -हेमंत गायकवाड, बांधकाम व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT