MLA Hiraman Khoskar, former MLA Shivram Jhole and board of directors on election of chairman-deputy chairman
MLA Hiraman Khoskar, former MLA Shivram Jhole and board of directors on election of chairman-deputy chairman esakal
नाशिक

Ghoti APMC : घोटी बाजार समितीच्या सभापतीपदी ज्ञानेश्‍वर लहाने! बिनविरोध निवड

सकाळ वृत्तसेवा

Ghoti APMC : सहकार क्षेत्रात इगतपुरी तालुक्यातील अत्यंत महत्वपूर्ण संस्था समजल्या जाणाऱ्या व मुंबईला थेट भाजीपाला पुरविणाऱ्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नाशिक जिल्हा मजूर संघटनेचे संचालक ज्ञानेश्‍वर लहाने यांची, तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ यांची निवड झाली. या निवडीची घोषणा होताच गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला. (Ghoti APMC Dyaneshwar Lana as Chairman of Ghoti Bazaar Committee Uncontested choice nashik news)

बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने १८ पैकी १६ जागांवर बाजी मारत बहुमत मिळविले आहे. त्यामुळे पहिल्या टर्ममध्ये सभापती व उपसभापती म्हणून कोणाची वर्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष लागून होते.

गुरूवारी (ता. २५) निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांच्या अध्यक्षतेखाली सभापती, उपसभापती निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष बैठक झाली. या वेळी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पॅनेलचे नेते माजी आमदार शिवराम झोले, ॲड. संदीप गुळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी नेतृत्त्व केले. नवनिर्वाचित संचालक निवृत्ती जाधव, सुनील जाधव, हरिदास लोहकरे, रमेश जाधव, अर्जुन पोरजे, भाऊसाहेब कडभाने, राजाराम धोंगडे, अर्जुन भोर, संपत वाजे,

नंदलाल पीचा, भरत आरोटे, रमेश खंडू जाधव, सुनीता गुळवे, आशा खातळे, दिलीप चौधरी, मारुती आघान आदी संचालकांसह मविप्रचे माजी संचालक भाऊसाहेब खातळे, माजी सभापती भगवान आडोळे, नंदलाल भागडे, रामदास गव्हाणे, रमेश धांडे, केरू पाटील देवकर, भगीरथ मराडे, दिगंबर शिरसाठ, दिगंबर पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT