ghoti lockdown.jpg 
नाशिक

सोमवारपासून घोटीत १४ दिवस लॉकडाउन; प्रशासनाचा निर्णय

गोपाळ शिंदे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (घोटी) कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घोटी ग्रामपालिकेने कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सोमवार (ता. २७) पासून पुन्हा १४ दिवसांचा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 

वॉर्डात निर्जंतुकीकरण

गेल्या २२ मार्चपासून आतापर्यंत घोटीत चार वेळा संपूर्ण लॉकडाउन करण्यात आला आहे. यापूर्वी तसेच नव्याने आढळलेला कोरोना रुग्ण परिसर सील करण्यात येत आहे. रुग्ण तपासणीकरिता आशासेविका व ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांद्वारे घरोघरी आरोग्यतपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक वॉर्डात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. नागरिकांची हेळसांड होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. ग्रामपालिका कर्मचाऱ्यांना विविध वॉर्डांत नागरिकांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आले आहे. 

तीन दिवस दुकाने खुली
 
तहसील कार्यालयात व्यापारी, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्यात गुरुवारी (ता. २३) झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. शुक्रवार (ता. २४)पासून तीन दिवस शहर खुले करण्यात येणार असून, नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आवाहन व्यापारी, प्रशासन व ग्रामपालिकेने केले आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्यास संचारबंदी उठविण्यात येईल, असेही सांगण्यात आले. 

समन्वय साधून नागरिकांना विविध सुविधांचा अभाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेत आहोत. वॉर्डानुसार आरोग्यतपासणी सुरू असून, निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. सोमवारनंतर १४ दिवस शहराच्या संपूर्ण सीमारेषा बंद करण्यात येणार आहेत. - संजय आरोटे, प्रभारी सरपंच, घोटी ग्रामपालिका 

लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र वाइन शॉप बंद राहील असे पाहावे. दुकानात कर्मचारीसंख्या पाहता व नागरिकांची गर्दी रुग्णसंख्येत वाढ करणारी ठरेल. घोटी शहर केंद्रबिंदू असल्याने रुग्ण व अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. - रामदास भोर, ग्रामपालिका सदस्य घोटी 

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT