gulvel esakal
नाशिक

कोरोनावर ‘गूळवेल’ ठरतेय अमृत! गुणकारी फायद्यांमुळे मोठी मागणी

आदिवासी भागात वनस्पतीला मोठी मागणी

दिगंबर पाटोळे

वणी (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागासह शहरातही गूळवेल (अमृतवेल) या वनस्पतीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. अनेक आजारांवर गूळवेल गुणकारी असल्यामुळे शहरातील असंख्या कुटुंबाकडून त्याची मागणी होत आहे

गुळवेल म्हणजे संजीवनीच!

गूळवेल ही वनस्पती शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करीत असल्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक कुटुंबानी गूळवेलचा काढा घेण्यास पंसती दिली आहे. अनेक आजारांवर ही वेल अमृतवेल ठरत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. गूळवेलचा काढा सेवन केल्याने ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, थंडी, मळमळ, मूळव्याध, साधेदुखी, आम्लपित्त, काविळ, पोटदुखी, मुधमेह आटोक्यात येतो, असे सांगितले जात आहे. त्याप्रमाणे डेंगी, चिकन गुनिया, स्वाइन फ्लू या आजारांवर गूळवेल गुणकारी असल्यामुळे शहरातील असंख्या कुटुंबाकडून त्याची मागणी होत आहे.

गुळवेलला मोठी मागणी

ग्रामीण भागात कडुनिंबाच्या झाडावर व आंब्याच्या झाडावर गुलवेल ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत असते. कडुनिंबाच्या झाडावरील गुळवेलला मोठी मागणी आहे. या वेलीची ओळख ग्रामीण भागातील जाणकार व्यक्तींनाच आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यासून अनेक कुटुंब गूळवेल काढ्याचे सेवन करीत आहे. काहीजण या वेलीचे छोटे तुकडे करून रात्री पाण्यात भिजत ठेवतात. सकाळी उपाशीपोटी या पाण्याचे सेवन करतात. तर, काही कुटूंब या वेलीचे तुकडे पाण्यात टाकून ते पाणी उकळून पितात. गूळवेल हा एक रानभाजीचा प्रकारही मानला जातो.

गूळवेलचे फायदे...

- रोगप्रतिकारक क्षमता वाढते

- ताप कमी होण्यास मदत

- मलेरिया, टॉयफाइडवर फायदेशीर

- पोटाच्या समस्या दूर होतात

- मधुमेहावर गुणकारी

- दम, खोकला आणि कफ कमी होतो

- लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT