Girish Mahajan reviewing preparations for Prime Minister Narendra Modi's visit. MLAs Rahul Dhikle and Ganesh Gite are neighbors. esakal
नाशिक

PM Modi Nashik Visit : जखमी अवस्थेतही सभा नियोजनासाठी धावपळ; महाजनांसह आमदारांची मेहनत फळाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यासह भाजप आमदार व पदाधिकाऱ्यांची मेहनत फळाला आली.

सकाळ वृत्तसेवा

PM Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यासह भाजप आमदार व पदाधिकाऱ्यांची मेहनत फळाला आली. गिरीश महाजन हे पाच दिवसांपासून नाशिक शहरांमध्ये तळ ठोकून आहे. (Girish Mahajans hard work paid off after Prime Minister Narendra Modis visit to Nashik took place in a jubilant atmosphere news)

मैदान निश्चित करणे, मंडप टाकणे, रोड-शोचे आयोजन, जाहीर सभेला गर्दी जमविणे, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचे दौऱ्याचे नियोजन करणे यांसारख्या महत्त्वाच्या कामांची जबाबदारी महाजन यांनी शिरावर घेतली.

यादरम्यान धावपळीत महाजन पडल्याने जखमी झाले. या अवस्थेतही त्यांनी सभा नियोजनाचे शिवधनुष्य यशस्विरीत्या पेलले. शासकीय विश्रामगृहावर रात्री मुक्काम केल्यानंतर सकाळी लवकर मोदी मैदानावर येऊन कामाची पाहणी करणे, रात्री उशिरा मैदानावर थांबून कामाचे नियोजन महाजन यांच्यामार्फत होत होते.

आमदार ॲड. राहुल ढिकले, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, नीलेश बोरा, तसेच अन्य पदाधिकारी महाजन यांच्या सोबतीला होते. त्यात श्री काळाराम मंदिरगोदावरीपूजन हे दोन कार्यक्रम वाढवून आल्याने नियोजनाची जबाबदारी अधिक वाढली.

जसा जसा सभेचा दिवस जवळ येत होता तसे कामाचा ताणदेखील वाढत होता. मोदी नावाची किमया असली तरी एक लाखांहून अधिक नागरिकांना सभामंडपात बसवणे व त्यांची सोय करण्याची मोठी कामगिरी महाजन ढिकले व गिते यांच्यावर होती.

दौरा यशस्वी झाल्यानंतर सर्वांची मेहनत फळाला आली. सभेचे यशस्वी नियोजनामुळे पुन्हा एकदा संकटमोचक बिरुदावली गिरीश महाजन यांनी खरी करून दाखवल्याची प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

प्रत्यक्ष सभा सुरू होत असताना महाजन यांनी गर्दीचे नियोजन केले. ज्या ठिकाणी गर्दी कमी होती त्या ठिकाणी उभ्या असलेल्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था केली.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जेथे येते तिथे यश, हे सूत्रच आहे. सभेसाठी सर्वांनीच मदतीला कमी-अधिक प्रमाणात हातभार लावला. त्यामुळे सभा यशस्वी झाली." - गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT