Girl Murder not suicide 
नाशिक

नाशिक : ‘त्या’ तरुणीची आत्महत्या नव्हे, हत्या

काकांचा निवेदनाद्वारे आरोप

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ओझर परिसरात गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणीच्या काकांनी ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा आरोप लेखी निवेदनाद्वारे केला आहे.

पूर्वा नितीन पगारे (वय १९, रा. हनुमान चौक, वेशीजवळ, ओझर) हिने शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी घरात कुणी नसताना ओढणीच्या सहाय्याने छताच्या हुकला गळफास घेत आत्महत्या केली. तिचा मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला असता पुर्वाचे काका अनिल पगारे, अजय पगारे व कुटुंबीयांनी हा प्रकार आत्महत्येचा नसून खुनाचा असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी पगारे कुटुंबीयांची समजूत काढल्याने पूर्वाच्या नातेवाईकांनी तिचा मृतदेह ताब्यात घेत मोरवाडी अमरधाम (सिडको) येथे शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान शनिवारी (ता. १९) पूर्वाचा वाढदिवस होता. मात्र, वाढदिवसालाच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ तिच्या कुटुंबियांवर ओढावली. घटनास्थळावरून तिचा मोबाईल गहाळ असल्याने तिच्या नातेवाईकांचा संशय बळावल्याने त्यांनी ओझर पोलीस ठाण्यात सदर प्रकार हा आत्महत्येचा नसून खुनाचा असल्याने याप्रकरणाचा तपास करण्यात यावा या आशयाचे निवेदन दिले. ओझरचे पोलीस निरीक्षक अशोक राहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक स्वप्नील जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT