PML26B10323
पिंपळगाव बसवंत ः ॲड. गीतेश व गौरव बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांचा धनादेश आमदार दिलीप बनकर यांच्याकडे सुपूर्द करताना खासदार भास्कर भगरे, भास्करराव बनकर, तानाजीराव बनकर, अशोक शाह आदी
---------------
वाढदिवसाऐवजी सामाजिक उपक्रम
ॲड. गितेश, गौरव बनकरांकडून दुष्काळग्रस्तांना मदत
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.१२ ः वाढदिवसाला बॅनरबाजीसह चंगळवाद करण्यापेक्षा समाजसेवेचे कार्य करण्याचा संकल्प ॲड. गीतेश व गौरव बनकर यांनी हाती घेत तानाजीराव बनकर यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवीत आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी २५ हजार रुपयांचा धनादेश दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
ॲड. गीतेश व गौरव बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त तानाजी बनकर सेवाभावी संस्थेतर्फे दिव्यांगाना साहित्य वितरण खासदार भास्कर भगरे यांच्या उपस्थितीत झाले. आमदार दिलीप बनकर, तानाजी बनकर, दिलीप मोरे, अशोक शाह प्रमुख उपस्थित होते. खासदार भगरे म्हणाले,‘ बनकर बंधुंनी वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा आदर्शवत पायंडा पाडला आहे. आमदार बनकर, भास्करराव बनकर यांनी मार्गदर्शन केले. ॲड. गीतेश बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना साहित्यांचे वाटप करण्यात आले. तानाजी बनकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाला २५ हजार रुपये निधी दिला.
पाराशरी पतसंस्थेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाला सुरेश खोडे, करसन ठक्कर, काशिनाथ विधाते, साहेबराव देशमाने, शंकरराव बनकर, नगरसेवक गणेश बनकर, महेश अहिरे, राजेंद्र खोडे, शंकर ठक्कर, उमेश जैन, संतोष निकम, गणेश कुशारे, महेश चांदवडकर, स्मित शाह आदी उपस्थित होते.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.