Glenmark investment of hundreds of crores in district nashik news esakal
नाशिक

Nashik News : जिल्ह्यात ग्लेनमार्क ची शेकडो कोटीची गुंतवणूक

नाशिक मध्ये आसलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठामुळे आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन केले जात आहे.

सतिश निकुंभ

Nashik News : नाशिक मध्ये आसलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठामुळे आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन केले जात आहे. याचाच विचार करून आक्राळे एमआयडीसी त रिलायन्सने सर्वात मोठा फार्मा उत्पादनाचा प्रकल्पाचे काम सुरू आहे.

या नंतर फार्मा क्षेत्रात आता जगात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी ग्लेनमार्क ही आक्राळेत आपला फार्मसिटील उत्पादनाचा नविन प्रकल्प साकारणार आहे. (Glenmark investment of hundreds of crores in district nashik news)

त्यासाठी नुकतीच त्यांना दहा हजार मिटरचा भुखंड देण्यात आला आसून त्यासाठी फुड अॅड ड्रक्स सह इतर विभागाने बाधंकामाच्या परवानगी देत नवीन वर्षाच्या सुरवातीला नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे नाशिक मधील आक्राळेची वाटचाल ही फार्मा हब कडे चालल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान दिडोरी रोडवरील आक्राळेत

आक्राळे एमआयडीसीत फार्मा क्षेत्रातील आघाडीची कंपनी आसलेली ग्लेनमार्क या ग्रुपची नाशिक सातपूर एमआयडीसी मध्ये मोठा प्रकल्प साकारला आहे या प्रकल्पात बाधंकाम करण्यास जागा शिल्लक नाही कोरोना नंतर कंपनीच्या उत्पादनाला वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीचे कार्पोरेटचे वरीष्ठ आधिकारी तसेच स्थानिक आधिकारी किरण पाटील,ब्रिजेस जाधव आदीसह अन्य आधिकारीनी नविन प्रकल्पासाठी जागेचा शोध सुरू केला होता.

या बाबत उद्योग मंत्री उदय सामंत याना या बाबतची कुणकुण लागताच त्यांनी एमआयडीसीचे प्रादेशिक आधिकारी नितीन गवळी यांच्या माध्यमातून कंपनीशी संपर्क करत त्याच्या मागणी बाबत सकारात्मक चर्चा करून त्यांना आक्राळे एमआयडीसी प्लाॅट नंबर डी.7/8 असा भुखंड देण्यात आले मागील सहा महिन्या पुर्वीच त्यांनी एमआयडीसीकडे कायदेशीर भरणा करत कंपनीने सुमारे दहा हजार मिटर चा भुखंड ताब्यात घेतला आहे. या भुखंडावर पहील्या टप्प्यात सुमारे 3 हजार 143.57 स्वअर मिटर बाधंकाम करण्याचा आरखडा तयार करण्यात आला आहे

गेल्या तिन महीण्या पासून फुड अॅड ड्रक्स. एमपीसिबी.एमआयडीसी सह इतर विभागाच्या बाधंकामासाठी परवानगीसाठी पाठपुरावा सुरू केला होता नुकताच त्यांना फुड अॅड ड्रक्स. एमपीसिबी मार्फत परवानगी देण्यात देण्यात आली आहे तसेच एमआयडीसी टेक्निकल विभागाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. नवीन वर्षात बाधंकामाला श्री गणेशा केल्याचे कंपनीचे वरीष्ठ आधिकारी सकाळशी बोलतांना सागितले.

''नाशिक च्या औद्योगिक क्रांतीची सुरवात झाली अस म्हटले तर वावगे ठरू नये रिलायन्स पाठोपाठ ग्लेन मार्क या मोठ्या फार्मा कंपनीनेही आक्राळेत मोठा प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी फुड अॅड ड्रक्स तर्फे कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे नविन वर्षात हा प्रकल्प साकारला जाणार यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न वेगाने सुरू आहे.'' - सह आयुक्त मुकुंद डोगळीकर फुड अॅड ड्रक्स, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT