नाशिक

धुवा दिन साजरा

CD
धुळे : मुख्य अंकातील पानासाठी.... -- फोटो क्रमांक : 32524 विसरणे (ता. धुळे) : जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्याना स्वच्छ हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करताना शिक्षक, कर्मचारी. -- जिल्ह्यात जागतिक हात धुवा दिन उत्साहात -- प्रात्यक्षिकांद्वारे पटवून दिले आरोग्यासाठी हात धुण्याचे महत्त्व सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत जिल्ह्यात ग्रामपंचायत कार्यालये, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये १५ ऑक्टोबरला जागतिक हात धुवा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून हात धुण्याचे आरोग्यदायी फायदे आणि महत्त्व पटवून देण्यात आले. हात धुण्याच्या योग्य सवयींमुळे आजारांचा प्रसार रोखता येतो, याबद्दल ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळांमध्ये साबणाची उपलब्धता व्हावी, यासाठी गावांमध्ये साबण गोळा करण्यासाठी विशेष रॅली काढण्यात आली. तसेच, विद्यार्थ्यांना व नागरिकांना प्रात्यक्षिकांद्वारे योग्य पद्धतीने हात धुण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे आणि पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा जिल्हास्तरीय उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्र प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षक, ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

Latest Marathi News Update : मसाल्यांमध्ये रंगांचा वापर चालणार नाही- तुकाराम मुंढे

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

SCROLL FOR NEXT