नाशिक

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यशाळा

CD
धुळे टुडे २ साठी अँकर --- फोटो- NSK26H31175 धुळे ः जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित स्नेहसंमेलन व मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी उपस्थित राजवर्धन कदमबांडे, बाबासाहेब बेलदार व मान्यवर. --- ज्येष्ठांनी अनुभवाची शिदोरी समाजहितासाठी वापरावी बाबासाहेब बेलदार ः जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यशाळा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २ ः सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांनी सेवाकाळात मिळविलेला अनुभव समाजाच्या हितासाठी वापरावा आणि विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी केले. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समाजकल्याण व विशेष सहाय्य विभाग, जोगाईमाता सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक मंडळ (कापडणे) आणि कृतिशील निवृत्त अधिकारी व कर्मचारी संस्था (धुळे) यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलन व मार्गदर्शन कार्यशाळा झाली. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेलदार अध्यक्षस्थानी होते. जोगाईमाता मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील, कृतिशील संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, समाजकल्याण निरीक्षक सुवर्णा उपकारे, राजेश काळे, सुरेश थोरात, कल्पना कुंभार, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र माळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सभागृहाच्या प्रवेशद्वारावर ज्येष्ठ नागरिकांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. बाबासाहेब बेलदार म्हणाले, की सेवानिवृत्तीनंतर आपल्या आवडी, छंदांना वेळ देऊन आरोग्याची काळजी घ्यावी आणि चिंतामुक्त, तणावमुक्त जीवन जगावे. कदमबांडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. ज्येष्ठांना मार्गदर्शन योगेश पाटील यांनी समाजकल्याण विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. ॲड. योगेश चौधरी यांनी सायबर क्राइमपासून बचाव, डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, तसेच ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. प्रवीण महाजन यांनी ‘आयतं पोयतं सख्यानं’ हा अहिराणी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. प्रा. उषा पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक महिलांना मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांचा सन्मान कृतिशील निवृत्त अधिकारी व कर्मचारी संस्थेच्या संघटनात्मक व सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांची सीईओ बेलदार व योगेश पाटील यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. सुरेश थोरात, देवीदास शिरुडे, हरिश्चंद्र रेंडे, अरुण जोशी, डॉ. राजेंद्र जोशी, अविनाश मोरे, मधुकर ठोसर, आर. सी. वाणी, वसंतराव गायकवाड, सजन भोई, प्रा. सी. डी. साळुंखे, धर्मा चौधरी, जिवन रोकडे यांचा गौरव करण्यात आला. कृतिशील संस्थेच्या महिला कक्षाच्या समन्वयकपदी नियुक्तीचे पत्र कल्पना कुंभार यांना देण्यात आले. डॉ. पाटील यांनी प्रास्ताविक केले. अविनाश मोरे यांनी सूत्रसंचालन केले. देवीदास शिरुडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय देवरे, आर. के. पाटील, डॉ. राजेंद्र चिंचोले, सजन भोई, अरविंद सूर्यवंशी, कमलेश चौधरी, श्री. कदम यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT