धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H31434
मोहाडी : श्री पिंपळादेवी माध्यमिक विद्यालयात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ नागरिक, शिक्षक. समोर विद्यार्थी.
---
पिंपळादेवी विद्यालयात
ज्येष्ठ नागरिक दिन साजरा
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : शहराच्या मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त विद्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या वेळी ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासह उपस्थितांनी शपथ घेतली.
मुख्याध्यापक एस. एस. पाटील अध्यक्षस्थानी होते. निंबा पाटील, शंकर पगारे, दिलीपसिंग गिरासे, ईश्वर पाटील, प्रताप गावडे, अरुणाबाई रामराजे, मंगला सोनवणे, शोभाबाई पाटील यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांविषयी असलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञता आपल्या मनोगतातून व्यक्त केली. तनाक्षी सोनवणे, लावण्या वायसे, सायली शिंदे, हेतल गवळी, तन्मय पाटील आणि धीरज सोनवणे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबाचे आणि समाजाचे मार्गदर्शक असून त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना संस्कार व जीवनमूल्यांची शिदोरी मिळते, असा सूर या वेळी व्यक्त करण्यात आला. उपमुख्याध्यापक ए. आर. पाटील, पर्यवेक्षक एस. एन. सोनवणे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डी. ए. देवरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.