Officers of Niri inspecting the concrete floor in Godavari esakal
नाशिक

Nashik News: काँक्रिटीकरणावरून गोदा संवर्धन- पुरोहित संघात मतभेद; निरीच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गोदावरी नदीच्या टाळकुटेश्‍वर पुलापर्यंत नदीपात्रातील काँक्रिटीकरणाबाबत लवकरच निरीला अहवाल सादर करणार असल्याची माहिती निरीचे अधिकारी पारस सुराणा यांनी दिली.

दुसरीकडे नदीपात्रातील तळ काँक्रिट काढण्याबाबत याबाबतचे याचिकाकर्ते नदी संवर्धन समिती व पुरोहित संघातील मतभेद अधिकाऱ्यांसमोरच चव्हाट्यावर आल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही गोदापात्रातील तळ काँक्रिट काढण्यासंदर्भात प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले. (Goda Conservation over concretization Disagreement in Purohit Sangh Inspection by officers of Niri Nashik News)

प्रशासनातर्फे गत कुंभमेळ्यापूर्वी नदीपात्रात तळ काँक्रिट टाकून छोट्या-छोट्या कुंड तोडून अखंड कुंडांची निर्मिती करण्यात आली होती.

मात्र काँक्रिटीकरणामुळे नदीपात्रातील जिवंत जलस्रोत बंद झाल्याचा दावा करत देवांग जानी यांनी करत उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्‍यायालयाने श्री. जानी यांची याचिका दाखल करून घेत संबंधित यंत्रणेला काँक्रिटीकरण काढून घेण्याबाबत आदेशित केले.

त्यानंतर रामकुंड वगळून त्या खालच्या काही कुंडातील तळ काँक्रिट काढले. परंतु जलस्रोत पुन्हा पुनरुज्जीवित होण्यासाठी कुंडातील तळ काँक्रिट काढण्याची मागणी जानी यांची आहे.

शासनाने जिल्हाधिकाऱ्यांसह तीन जणांची समिती गठण केली असून, त्या समितीच्या शिफारशीनुसार मंगळवारी (ता. ३) निरीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

या वेळी निरीचे कुमार अमृत, स्मार्टसिटीचे सीईओ सुमंत मोरे, डॉ. प्राजक्ता बस्ते या अधिकाऱ्यांसह देवांग जानी, निशिकांत पगारे, गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष दिलीप शुक्ल, कल्पना पांडे आदी उपस्थित होते.

छोट्या मंदिरांचा विषयही चर्चेत

नदीपात्रातील प्राचीन जलस्त्रोताबाबत निरी पथकाने संबंधितांकडून माहिती जाणून घेतली. जानी यांनी १७ प्राचीन कुंडांची माहिती दिली. दक्षिण गंगा झालेले ठिकाण, अस्थीवलय कुंड, धनुष्य कुंड याबाबतही अधिकाऱ्यांना नकाशासह माहिती दिली.

प्राचीन सतरा कुंडांचा उल्लेख शासनाच्या गॅझेटमध्येही असल्याचे निदर्शनास आणून दिले. तळ काँक्रिट १९५५-५६ ला प्रथम टाकण्यात आल्याचा दावा पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी केला.

या वेळी तोडण्यात आलेल्या देवी मंदिरामागील सांडव्यासह अन्य छोट्या मंदिरांचा विषयही चर्चेत आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT