नाशिक

''गोदा एपीक ट्रेल रन'' ठरणार अविस्‍मरणीय अनुभव

CD
पान चार मेन -------------------- 33946 नाशिक : सकाळ आयोजित गोदा एपिक ट्रेल रन बैठकीत ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, सरव्यवस्थापक संजय पाटील, मंदार जाणोरकर, अश्‍विनी देवरे, जितेंद्र गाडेकर, महेश साळवे आदी. ''गोदा एपिक ट्रेल रन'' ठरणार अविस्‍मरणीय अनुभव मान्‍यवरांच्‍या अपेक्षा, स्‍पर्धेस शुभेच्‍छा देत केले सहभागाचे आवाहन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २९ः गंगापूर धरणालगतच्या वृक्षवल्‍लीतील निसर्गरम्‍य वातावरणात धावतानाचा अनुभव धावपटूंसाठी अविस्‍मरणीय ठरेल. समृद्ध नाशिकचा वारसा अनुभवण्याची ही पर्वणी ठरणार आहे. सिंहस्‍थ कुंभमेळापर्वास सुरुवात होत असतांना, या दरम्‍यान येत्‍या २० डिसेंबरला आयोजित ''गोदा एपिक ट्रेल रन'' ही शर्यत उत्‍साह वाढविणारी असेल, अशा अपेक्षा करताना मान्‍यवरांनी स्‍पर्धेसाठी शुभेच्‍छा दिल्‍या. व अधिकाधिक धावपटूंनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन यानिमित्त केले. मुंबईनाका येथील ''सकाळ''च्‍या कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी क्रीडा क्षेत्रातील मान्‍यवर उपस्‍थित होते. याप्रसंगी नाशिक रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मंदार जाणोरकर, अल्‍ट्रा रनर महेश साळवे, ट्रायथलॉन निखिल परदेशी, आयर्नमॅन डॉ.प्रशांत देवरे, आयर्न वूमन अश्‍विनी देवरे यांच्‍यासह जी शॉपीचे संचालक जितेंद्र गाडेकर, आकाश गाडेकर, श्री. गाडेकर आदी उपस्‍थित होते. प्रास्‍ताविकात ''सकाळ''च्‍या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे सरव्‍यवस्‍थापक संजय पाटील म्‍हणाले, की ''सकाळ''च्‍या माध्यमातून विविध उपक्रमांचे यशस्‍वी आयोजन केले जाते. जी-फाईव्‍ह फाउंडेशनच्‍या सहकार्याने आयोजित केल्‍या जाणाऱ्या गोदा एपिक ट्रेल रन ही धावण्याची शर्यतदेखील नाशिककरांसाठी पर्वणी ठरणार आहे. विविध स्तरांवरून नोंदणीला प्रतिसाद मिळतो आहे. जितेंद्र गाडेकर यांनी उपस्‍थितांचे स्‍वागत केले. तसेच अनुभव धावपटूंनी केलेल्‍या मार्गदर्शनातून स्पर्धा अधिक प्रभावी व व्‍यापक बनविण्यास मदत होणार असल्‍याचा विश्‍वास व्‍यक्‍त केला. ------------------ 33939 सिंहस्‍थ कुंभमेळ्याच्‍या काळात मंत्रभूमी नाशिकमध्ये होत असलेल्‍या गोदा एपिक ट्रेल रनला धावपटूंचा उत्‍स्‍फूर्त सहभाग लाभेल. नाशिकची जगभरात ओळख येथील गोदावरीमुळे आहे. याच गोदाकाठावर धावताना धावपटूंना निसर्गाचा वारसा अनुभवता येणार असल्‍याने आनंद द्विगुणित होणार आहे. - मंदार जाणोरकर, अध्यक्ष, नाशिक रनर्स असोसिएशन. ----- 33937 गोदा एपिक ट्रेल रनमध्ये सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे. गंगापूर धरण परीसरात धावताना विविध आव्‍हानांचा सामना करताना धावपटूंचा कस लागणार आहे. आपल्‍यातील क्षमता तपासणे आणि स्‍वतःला सक्षम बनविण्यासाठी स्‍पर्धेतील सहभाग महत्त्वाचा ठरेल. - महेश साळवे, अल्‍ट्रा रनर --- 33940 ग्रामीण, दुर्गम भागातील खडतर मार्गावर धावण्याचा आनंद वेगळाच ठरतो. स्‍थानिकांकडून मिळणारे प्रोत्‍साहन धावपटूचा उत्‍साह वाढविणारे असते. त्यामुळे गोदा एपिक ट्रेल रन ही स्‍पर्धा इतर धावण्याच्‍या शर्यतींपासून निश्‍चित वेगळी ठरेल. जास्‍तीत जास्‍त धावपटूंनी सहभागी व्‍हावे. - डॉ.प्रशांत देवरे, धावपटू (आयएमए माजी अध्यक्ष) --- 33941 राज्‍यभरातून स्‍पर्धक सहभागी होणार असल्‍याने स्‍पर्धेत चुरस बघायला मिळेल. इतर ठिकाणच्‍या धावपटूंना नाशिकचे निसर्गरुपी वैभव या स्‍पर्धेतून अनुभवायला मिळेल. तर स्‍थानिक धावपटूंना गोदाकाठी धावत बक्षीस जिंकण्याची संधी असेल. उपक्रमात सर्व स्तरावरून सहभागी झाले पाहिजे. - निखिल परदेशी, ट्रायथलिट. 33945 गंगापूर धरण परिसरात होत असलेल्‍या गोदा एपिक ट्रेल रनमध्ये अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्‍हायला हवे. अशा स्‍पर्धांतून आपल्‍या क्षमता वाढविण्याची संधी असते. भविष्यातील आणखी खडतर स्‍पर्धांची तयारी करण्याच्‍या दृष्टीने ही स्‍पर्धा पाया रचेल, असा विश्‍वास वाटतो. - अश्‍विनी देवरे, आयर्नमॅन. 3393८ क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, धावपटू यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्याने इतर धावपटू यांचा आत्मविश्‍वास वाढणार आहे. सर्वस्तरावर स्पर्धेविषयी उत्सुकता बघायला मिळते आहे. -जितेंद्र गाडेकर

Youth Congress Protest in Karad Against Sanjay Gaikwad : शेतकऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध; कऱ्हाडमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवत युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

Sakal Impact : 'सकाळ' इम्पॅक्ट; एमपीएससी गैरव्यवहार चौकशीला अखेर मुहूर्त, १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

Pattankodoli Birdev Yatra Farande Baba Bhakanuk : राज्यासह केंद्रात राजकीय उलथापालथ होईल, देशात आंदोलने होतील; पट्टणकोडोली फरांडे बाबांची भाकणूक उत्साहात संपन्न

Diwali Water Supply Update in Pune : दिवाळीत पुणेकरांना मोठा दिलासा; ५ नोव्हेंबर रोजीची गुरुवारची पाणी कपात रद्द, सुरळीत पाणीपुरवठा होणार

SCROLL FOR NEXT