नाशिक

गोदाघाटावरील विद्रुपीकरण अखेर हटवले

CD
फोटो : H35194 गोदाघाटावरील विद्रूपीकरण अखेर हटवले मनपाची दंडात्मक कारवाई, स्वच्छता मोहीम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : छटपूजेसाठी गोदाघाटावर जागा आरक्षित करण्याच्या नादात काही भाविकांनी घाटाच्या दगडी पायऱ्यांवर ऑईल पेंटने स्वतःची नावे लिहून विद्रूपीकरण केले होते. रविवारी (ता. १५) उत्तर भारतीयांचा महत्त्वाचा सण असलेल्या छटपूजेदरम्यान हा प्रकार घडला. या घटनेमुळे गोदाप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. छटपूजा पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिकेकडून घाटावरील कचरा आणि निर्माल्य उचलण्यात आले. मात्र, पायऱ्यांवर रंगवलेली नावे तशीच असल्याने पर्यावरणप्रेमींनी ती त्वरित हटवण्याची मागणी लावून धरली. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास महापालिकेच्या कार्यालयासमोर ऑईल पेंट ओतून आंदोलन करण्याचा इशारा काही कार्यकर्त्यांनी दिला होता तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) याप्रकरणी निषेध नोंदविला होता. या इशाऱ्यानंतर आणि नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापालिका प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलली. छटपूजेच्या दिवशी घाटाचे विद्रूपीकरण करणाऱ्या काही विघातक प्रवृत्तींचा शोध घेऊन महापालिकेने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच, मंगळवारी विशेष स्वच्छता मोहीम राबवून गोदाघाटावर रंगवलेली सर्व नावे काढून टाकण्यात आली असून घाट पुन्हा स्वच्छ करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गोदाप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA अधिकारी बनून पानटपरीवर धाड, बोगस अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, ६ जणांना अटक; २.६६ लाखांची रोकड जप्त

Dhoni Retirement: "तू आमचा थाला अन् कर्णधार नेहमीसाठीच राहशील...", ऋतुराज गायकवाडची धोनीसाठी भावूक पोस्ट

१३ वर्षांचा वनवास संपला! नागपुरात रंगणार महाराष्ट्र केसरीचा महासंग्राम; १३०० मल्ल दाखवणार कुस्तीचा दम, 'या' तारखेला आयोजन

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

सिडकोची घरं धोकादायक, पाच वर्षांतच इमारतींची दुरवस्था; कुठे स्लॅब कोसळतोय, तर कुठे भिंतींना तडे

SCROLL FOR NEXT