नाशिक

खासदार वाजेंसह शेतकऱ्यांचा जलसंपदा कार्यालयात ठिय्या गोदावरील कालवा अस्तरीकरणाविरोधात शेतकरी आक्रमक

CD
पान-१--ॲंकर ------ SNR26B23233 नाशिक ः जलसंपदा विभागाच्या कार्यालयात ठिय्या देताना खासदार राजाभाऊ वाजे व शेतकरी. ------------------ स्थळपाहणी करून गावनिहाय पाहणीअंती निर्णय -------------- गोदावरी अस्तरीकरणप्रश्नी खासदार वाजेंचा ‘जलसंपदा’समोर ठिय्या ---------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.२३ ः गोदावरी उजव्या तट कालव्याच्या सिमेंट काँक्रिट अस्तरीकरणाच्या विरोधात शेतकरी आक्रमक होवू लागले आहेत. खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.२३) नाशिक येथील जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या दिला होता. दरम्यान याप्रश्नी स्थळपाहणी करून गावनिहाय निर्णय घेण्याचा तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले. ------------ जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सिमंतिनी कोकाटे, सोमठाणेचे माजी सरपंच भारत कोकाटे, बाळासाहेब लासगड, भाऊसाहेब थोरात, विनायक घुमरे, राजेंद्र घुमरे, बाळासाहेब शिंदे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. गोदावरी उजव्या तट कालव्याच्या दुरुस्तीच्या कामात सिमेंट काँक्रिट अस्तरीकरण होत आहे. कालवा परिसरातील विहिरी, बोअरवेल, कूपनलिका आणि इतर जलस्रोतांचे पुनर्भरण कालव्यातील पाण्याच्या झिरपण्याने होते. सरसकट सिमेंट काँक्रिट अस्तरीकरण केल्यास भूजल पातळीवर परिणाम होणार आहे. शेतीसाठी आवश्यक पाण्याच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कालव्याच्या पाण्यावर शेती, फळबागा, भाजीपाला उत्पादन आणि पशुपालन अवलंबून आहे. अस्तरीकरण करताना जलगळती रोखण्याबरोबरच भूजल पुनर्भरण, स्थानिक जलस्रोतांची स्थिती आणि भविष्यातील पाणी उपलब्धता यांचा शास्त्रीय पद्धतीने विचार करावा, तांत्रिक अभ्यास आणि स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव यांच्या आधारे निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. प्रत्येक गावातील परिस्थिती वेगवेगळी असल्याने सर्व ठिकाणी एकाच पद्धतीने अस्तरीकरण करण्याऐवजी गावनिहाय आवश्यकता तपासावी, कोणत्या गावात किती अंतरापर्यंत सिमेंट अस्तरीकरण आवश्यक आहे, कोणत्या भागात अस्तरीकरणाचा भूजल पुनर्भरणावर परिणाम होऊ शकतो, पर्यायी उपाययोजना यावर शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची सूचना खासदार वाजे यांनी केली. १६-१ स्थळपाहणी, गावनिहाय निर्णय अधिकारी व स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत गावनिहाय परिस्थितीची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. जलस्रोत, भूजल पुनर्भरणाची स्थिती, शेतीच्या पाण्याची गरज आणि अस्तरीकरणाची तांत्रिक आवश्यकता यांचा विचार यात होईल. शेतकऱ्यांना विश्वासात घेवून निर्णय घेण्याचे ठरले. ------------------- कोट गोदावरी उजव्या तट कालव्याच्या अस्तरीकरणाबाबत निर्णय घेताना शेतकऱ्यांचे हित, भूजल पुनर्भरण आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा विचार होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या सहमतीनेच योग्य निर्णय व्हावा. - राजाभाऊ वाजे, खासदार.

Maharashtra weather cyclone update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस खोडा घालणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!

Data Security : डेटा सुरक्षेत हलगर्जी भोवणार; आस्थापनांवर दंडाची टांगती तलवार; सहकारी बॅंका आणि पतसंस्थांनाही नियमावली लागू

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

IND W vs ZIM W: प्रतिका रावलचं शतक अन् शेफाली वर्माची वादळी खेळी! झिम्बाब्वेला लोळवत भारतीय महिलांचा ९ विकेट्सने दणदणीत विजय

Piyush Goyal : जर्मनीतील भारतीयांनी भारतातील तरुणांच्या कौशल्याला संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT