सूचना-- बातमीसाठी आवश्यक लोगो, क्यूआर कोड आणि चौकट निखिलकडे आहे.
----------
पान-३ मुख्य अंक--मेन करणे
------------------
सिंहस्थानिमित्त रंगणार ‘गोदा एपिक ट्रेल मॅरेथॉन’
-------------
सह्याद्रीच्या कुशीत धावण्याचा रोमांचक अनुभव; सकाळ माध्यम समूह आणि जी फाइव्ह फाऊंडेशनचा उपक्रम
-------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ ः निसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेले रस्ते आणि साहसी धावण्याचा थरार अनुभवण्याची संधी आता महाराष्ट्रातील धावपटूंना मिळणार आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘जी फाइव्ह फाऊंडेशन’ यांच्यातर्फे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘गोदा एपिक ट्रेल मॅरेथॉन’ या ट्रेल स्पर्धेचे आयोजन रविवारी (ता.२०) नाशिकजवळील पामस्टे, गंगापूर डॅम बॅकवॉटर, गिरणारे, नाशिक येथे करण्यात आले आहे. आरोग्य, फिटनेस, साहस आणि निसर्ग पर्यटन यांचा सुंदर संगम असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील धावपटू, फिटनेसप्रेमी, मॅरेथॉनपटू, युवक आणि साहसी क्रीडाप्रेमींना सहभागी होता येणार आहे.
---------------
या स्पर्धेमध्ये धावपटूंसाठी ३ किमी ऑब्स्टॅकल रन, ५ किमी, १० किमी, १५ किमी आणि २१ किमी हाफ मॅरेथॉन अशा विविध गटांचा समावेश करण्यात आला आहे. नवोदित धावपटूंपासून अनुभवी मॅरेथॉनपटूंपर्यंत सर्वांना त्यांच्या क्षमतेनुसार सहभागाची संधी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे ३ किमी ऑब्स्टॅकल रनमध्ये विविध अडथळ्यांचा सामना करत धावण्याचा रोमांचक अनुभव घेता येणार आहे.
नाशिकची गोदावरी नदी, निसर्गसंपन्न परिसर आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकची ओळख देशभर पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देतानाच निसर्ग पर्यटन आणि स्थानिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे. महाराष्ट्रातील धावपटूंनी या अनोख्या साहसी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. नोंदणी सुरू असून इच्छुक स्पर्धकांनी ‘गोदा एपिक ट्रेल मॅरेथॉन’ साठी नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी. आजच नोंदणी करा आणि निसर्गाच्या सान्निध्यातील या साहसी धावण्याच्या अनुभवाचा भाग व्हा! अधिक माहितीसाठी संपर्क आकाश ः८२०८५९२२७३, शरद ः ९८९००१११२०
----------------
सूचनेनुसार चौकट करणे
१६-१
कुठे आणि कधी
दिनांक : २० डिसेंबर २०२६
स्थळ : पामस्टे, गंगापूर डॅम बॅकवॉटर, गिरणारे, नाशिक
स्पर्धा प्रकार : ३ किमी ऑब्स्टॅकल रन | ५ किमी | १० किमी | १५ किमी | २१ किमी हाफ मॅरेथॉन.
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.