Gandhi Lake has been beautified with stone steps and tiles. After the interior decoration of the smart city, it has become a haven for lovers. esakal
नाशिक

Nashik News : गोदाकाठ बनला प्रेमी युगलांचा अड्डा!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मंदिराचे शहर अशी ओळख असलेल्या नाशकातील गोदाघाट परिसर म्हणजे नितांतसुंदर ठिकाण. अशा ठिकाणची भुरळ आता तरूण तरूणींनाही पडू लागल्याने गेल्या काही दिवसांपासून गोदाघाट प्रेमी युगुलांचा अड्डा बनला आहे.

विशेष म्हणजे याबाबत कोणाला संशय येऊ नये, म्हणून परिसरातील ज्येष्ठांच्या हातात पाच पन्नास रूपये देऊन त्यांनाही शेजारी बसविले जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे. (Godavari river godaghat become lovers point Nashik News)

निसर्गरम्य त्र्यंबकेश्‍वरसह शहरापासून पाच किलोमीटरवरील सोमेश्‍वर, तपोवन हे गेल्या काही दिवसांपासून प्रेमी युगुलांसाठी हक्काचे व निवांत ठिकाण बनले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाची डोकेदुखीही काही प्रमाणात वाढली आहे.

आता हे लोण थेट शहरातील गोदाकाठावर येऊन पोहोचल्याने काही प्रश्‍नही उपस्थित होत आहे. मात्र याकडे पोलिसांनी साफ कानाडोळा केल्याने अशा जोडप्यांचे धाडस वाढत आहे.

गांधी तलावाची जोडप्यांना भुरळ

गांधी तलावाच्या पश्‍चिमेकडील बाजूस म्हणजे एकमुखी दत्त मंदिराकडून होळकर पुलाकडे जाणा-या रस्त्यावरील गोदाकाठावर अशी अनेक जोडपी सकाळ सायंकाळी दृष्टीस पडतात, अलिकडे तर भर दुपारीही तरूण तरूणी नदीपात्रात पाय सोडून अश्‍लिल वर्तन करत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात.

सायंकाळनंतर ही जोडपी चक्रधर स्वामी मंदिराच्या पाठीमागील बाजूसही मोठ्या प्रमाणावर दृष्टीस पडतात. परिसरातील एखाद्या ज्येष्ठाने हटकल्यास दमदाटी वेळप्रसंगी शिवीगाळही केली जात असल्याने अनेकजण त्याकडे कानाडोळा करत असल्याचे काही ज्येष्ठांनी सांगितले.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

तपोवनातही तीच परिस्थिती

शहरापासून दोन किलोमीटरवर असलेल्या पंचवटीतील तपोवनात तर सकाळपासून रात्री उशीरापर्यंत प्रेमी युगलांचा मोठा वावर असतो, याठिकाणचे उद्यान म्हणजे म्हणजे जणू प्रेमीयुगुलांचे हक्काचे ठिकाणच बनले आहे. येथेही मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन प्रेमी युगुलांचा वावर असतो.

ज्येष्ठांची घेतली जातेय मदत

कोणाचा त्रास नको म्हणून तसेच संशय येऊ नये म्हणून परिसरातील एखाद्या ज्येष्ठास शेजारी बसविले जाते, त्यासाठी त्यांना काही पैसेही दिले जात आहेत. गंगाघाटावर गरीब, दिनदुबळे मोठ्या प्रमाणावर आश्रयास आहेत.

त्यामुळे अशा जोडप्यांना दहा वीस रूपयांत महिला किंवा पूरुष उपलब्ध होतात, त्यामुळे बघणारांना हे कुटुंब असल्याचे भासविले जाते, प्रत्यक्षात खरे चित्र वेगळेच असल्याची प्रचिती याठिकाणी फेरफटका मारला असता लक्षात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Black Magic Ritual: महाराष्ट्र हादरला! सोळा वर्षीय मुलीवर अघोरीकृत्य, वर्षभरापासून सुरू होता प्रकार! शेवपेटीत झोपवायचा अन्...

Latest Maharashtra News Updates : पंचगंगेच्या पाणीपातळीत अर्ध्या फुटाने घट; कोल्हापुरात अद्यापही ४८ बंधारे पाण्याखाली

Vidarbha Rain: विठ्ठल पावला... विदर्भात पावसाची संततधार; यवतमाळात नदी नाल्यांना पूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, सर्वत्र पावसाचा संचा

Hinjawadi IT Park : हिंजवडीमधील समस्यांचा मुख्यमंत्री घेणार आढावा; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Basmat Crime: विदर्भातील तरुणीवर प्रेमाच्या नावाखाली अत्याचार; वसमतमधील आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT