मेन
--------------
गोदेचे वाढते प्रदूषण,; महापालिकेला कारणे दाखवा
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पंधरा दिवसांत खुलासा करण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २८ : गोदावरी नदीच्या प्रदूषणावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महापालिकेची बँक गॅरंटी जप्त का करू नये आणि वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देश सक्षम प्राधिकरणाला का देऊ नयेत, असा जाब विचारताना पंधरा दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मंडळाचे प्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही. किलेदार यांनी नोटीस दिली आहे. महापालिकेचे राष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मलनिस्सारण विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांना हि नोटीस दिली आहे. पाच ऑक्टोबरला प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेले नमुने आणि उच्च न्यायालयाच्या एका याचिकेतील निर्देशांचा संदर्भानुसार नोटीस बजावली आहे. जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९७४ आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांनुसार विहित मानकांचे पालन करण्यासाठी निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे योग्य संकलन, प्रक्रिया आणि विल्हेवाट लावणे महापालिकेला अनिवार्य व बंधनकारक कर्तव्य आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या पूर्ततेसाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अर्जदारासह नाशिकमधील तीन ठिकाणांना भेट देऊन पाण्याचे नमुने गोळा केले होते. त्यात तपोवन येथे गोदावरी आणि कपिला नद्यांचा संगम, दसक भागात आग्रा महामार्गाजवळ गोदावरी नदी आणि टाकळी भागात गोदावरी नदी या तीन ठिकाणांचा समावेश होता. या तिन्ही ठिकाणांहून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांच्या विश्लेषणात ते निर्धारित मानकांपेक्षा जास्त प्रदूषित आढळले असून लागू असलेल्या पर्यावरणीय मानकांचे पालन झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
---------------चौकट
जलप्रदूषणाचा ठपका
जल तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार महापालिका वैधानिक पर्यावरणीय जबाबदाऱ्या पार पाडण्यात अयशस्वी ठरली असून, त्यामुळे गोदावरी नदीचे प्रदूषण झाले आहे आणि लागू पर्यावरणीय कायद्यांच्या तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावून बँक गॅरंटी जप्त आणि वीज-पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत पंधरा दिवसांच्या आत कागदपत्रांसह लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सद्यःस्थिती अहवाल विश्लेषण अहवालासह सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
--------------कोट------------
महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटीस प्राप्त झाली आहे. यासंदर्भात माहिती घेऊन सविस्तरपणे उत्तर देवू.
- रवींद्र धारणकर, अधिक्षक अभियंता, मलनिस्सारण विभाग, महापालिका.
--------------कोट
गोदावरी नदी व उपनद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी केवळ नोटिसा आणि पाहणीपुरते मर्यादित न राहता सांडपाणी प्रक्रिया यंत्रणांची प्रभावी अंमलबजावणी, सांडपाण्यावर नियंत्रण, नियमित पाणी गुणवत्ता तपासणी, दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी.
- निशिकांत पगारे, याचिकाकर्ता.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.