Gokul Narhari Zirwal 
नाशिक

Gokul Narhari Zirwal: नरहरी झिरवाळांचे चिरंजीव शरद पवारांशी 'निष्ठावंत'; 'या' मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी आज नाशिकमध्ये शरद पवार यांच्या व्यासपीठावर हजेरी लावली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नाशिक : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी आज नाशिकमध्ये शरद पवार यांच्या व्यासपीठावर हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंतांचा हा मेळावा होता. गोकुळ झिरवाळ हे आमदारकीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. यावेळी अजित पवारांसोबत असलेल्या वडील नरहरी झिरवाळ यांच्यावरही त्यांनी भाष्य केलं.

निष्ठावंतांच्या मेळाव्यात बोलताना गोकूळ झिरवाळ म्हणाले, "लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार भगरे यांना मी निवडून आणले. वडिलांची निष्ठा दुसऱ्यावर आहे पण कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं आहे. वडिलांची अजित पवार यांच्यावर निष्ठा आहे तर माझी शरद पवार यांच्यावर. यावेळी त्यांनी वडील नरहरी झिरवळ यांना शरद पवार यांच्याकडं यावं असं आवाहनही केलं"

गोकुळ नरहरी झिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील भेट घेतली.

दरम्यान, नरहरी झिरवाळ हे सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडण्यापूर्वी ते ठाकरे सरकारमधील १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी चर्चेत आले होते. विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त असल्यानं उपाध्यक्ष असलेल्या नरहरी झिरवाळ यांनीच तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेनेत बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र घोषित केलं होतं. पण हे प्रकरण पुढे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर आणि सत्ता बदल झाल्यानं राहुल नार्वेकर यांच्याकडं हा अपात्रतेचा विषय आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT