नाशिक

गोलाणी मार्केटमध्ये सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्याची मागणी

CD
गोलाणी संकुलात सार्वजनिक प्रसाधनगृह उभारा (उपशीर्षक) महापौर दीपमाला काळेंचे आयुक्तांना निवेदन; मागील बाजूचा सुचविला पर्याय सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी संकुलात सार्वजनिक प्रसाधनगृह नाही. यामुळे संकुलातील व्यापारी तसेच येथे येणारे ग्राहक, विशेषतः महिलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोरील उपलब्ध जागेत अत्याधुनिक सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्यात यावे, अशी मागणी महापौर दीपमाला काळे यांनी महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांच्‍याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील गोलाणी मार्केट हे प्रमुख व्यापारी संकुल म्हणून ओळखले जाते. मार्केटमध्ये विविध प्रकारची दुकाने आहे. याशिवाय काही व्यावसायिक कार्यालय, वाणिज्यिक आस्थापना आणि इतर कार्यालय देखील आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांतून संकुलात येणाऱ्या नागरिकांची संख्‍या अधिक आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत मार्केट परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. असे असताना एवढ्या मोठ्या व्यापारी संकुलात सार्वजनिक प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध नाही. संकुलात असलेल्‍या प्रसाधनगृहाची देखील दुरवस्था झालेली आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला ग्राहक, महिला कर्मचारी तसेच विविध कामांसाठी मार्केटमध्ये येणाऱ्या महिलांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद आहे. चौकट ‘गोलाणी’च्‍या मागील बाजूचा पर्याय महापालिका प्रशासकीय इमारतीच्या खाली अग्निशमन दलाचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या दरम्यान असलेल्या खाऊगल्लीच्या परिसरात सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्यासाठी जागा उपलब्ध असल्याचे निवेदनात म्‍हटले आहे. या जागेचा वापर करून सार्वजनिक प्रसाधनगृह उभारल्यास गोलाणी मार्केटमधील व्यापारी, कर्मचारी आणि ग्राहकांसाठी सोय होऊ शकते.

Nanded News : नवी दिल्लीतील 'ESTIC 2026' राष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. विजयकुमार जाधव यांची सलग दुसऱ्यांदा निवड!

BCCI Junior Selection Committee: भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाकडे मोठी जबाबदारी! परविंदर अवाना बनले BCCI ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष

Marathi News Live Updates: नाशिक कुंभमेळ्याआधी ५५० जणांचा सामूहिक शंखनाद; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार

Kojagiri Purnima 2026: यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त? जाणून घ्या पूजा विधी आणि पौराणिक कथा

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

SCROLL FOR NEXT