नाशिक

हातचलाखीने ६० हजारांचा गंडा

CD
दर्शनाच्या बहाण्याने सोन्याची अंगठी लंपास --- पत्ता विचारण्यासाठी ज्येष्ठ व्यक्तीला कारजवळ बोलावून हातचलाखी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाशी संवाद साधत कारमध्ये बसलेल्या ‘महाराजांचे’ दर्शन घेण्यास सांगून ठकबाजांनी सुमारे ६० हजार रुपयांची सोन्याची अंगठी काढून घेतली. ही घटना जाकीर हुसेन कॉलनीत घडली. मोहाडी रोडवरील जाकीर हुसेन कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक रामचंद्र गंभीर बेडीस्कर (वय ६३) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. ते रस्त्याच्या कडेला चालत असताना, गाडगेबाबा चौकाकडून आलेली पांढऱ्या रंगाची विनाक्रमांकाची कार त्यांच्याशेजारी थांबली. कारचालकाने बेडीस्कर यांना जवळ बोलावून, कारमध्ये महाराज बसले आहेत, त्यांचे दर्शन घ्या आणि आम्हाला एक पत्ता सांगा, असे सांगितले. कारजवळ गेल्यावर त्यांना आत पूर्ण नग्नावस्थेत एक व्यक्ती दिसली. त्याने बेडीस्कर यांच्या डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद दिल्याचा बनाव केला. पत्ता सांगताच कार निघून गेली. चौकट हातातील सोन्याची अंगठी गायब कार निघून गेल्यानंतर काही अंतर चालत गेल्यावर बेडीस्कर यांना बोट हलके वाटले. पहिल्या बोटातील ६० हजार रुपयांची सोन्याची अंगठी गायब असल्याचे लक्षात आले. आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने महाराज नाव सांगणाऱ्याने हातचालाखी करून अंगठी काढली होती. त्यांनी आरडाओरड करत कारचा पाठलाग केला. मात्र, चालक पसार झाला. या प्रकरणी रामचंद्र बेडीस्कर यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''सगळं लक्षात ठेवणार!'', राहुल-प्रियंका यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा काँग्रेसचा आरोप; व्हिडीओ केला पोस्ट

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT