Tea Business esakal
नाशिक

Winter Tea Business : थंडीमुळे चहा व्यावसायिकांना सुगीचे दिवस

सकाळ वृत्तसेवा

झोडगे (जि. नाशिक) : गुलाबी थंडीमुळे चहाला मागणी वाढली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना चहाचे स्टॉल आकर्षित करताना दिसतात. वाफाळलेल्या चहाकडे नजर गेली म्हणजे चहा पिण्याची इच्छा झालीच समजा. चहाचा दुकानांची नावे सरपंच, अमृततुल्य, उपसरपंच, आमदार खासदार, साई अमृततुल्य आदींसह भन्नाट नावे वापरून चहाची दुकाने महामार्गालगत सजलेली आहेत. त्यामुळे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. (golden days for tea businessman due to winter season cold weather Nashik news)

चहाची तलफ आली की तो हवाच असतो. चहा उत्साहवर्धक आहे. आळस झटकला जातो. झोप उडते, मनाला क्षणभर प्रसन्न वाटते आणि तृप्त झाल्यासारखे वाटते. म्हणून सकाळी झोपेतून उठल्यावर पहिला चहा आणि नंतर इतर कामे हाती घेणारा मोठा वर्ग आहे. वर्षभर चहा हवाच असतो. पण, हिवाळ्यात मात्र चहाची तलफ जास्त येते. दिवसातून अनेकवेळा चहा पिणाऱ्यांची संख्या वाढते. सध्या वातावरणात मोठा गारवा आहे. गुलाबी थंडी असल्यामुळे सकाळी उठल्यानंतर चहा पिण्यासोबत दिवसभर चहा पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

त्यामुळे दिवसभर चहाची टपरी, हॉटेल, कॉर्नर अशा ठिकाणी गर्दी पहायला मिळते. इतर महिन्यांच्या तुलनेत चहाला मागणी वाढली असून, ३० ते ४० टक्के चहा जास्त लागत आहे. चहाचे विविध ब्रँड बाजारात आले आहेत. गुळाचा चहा, कोरा चहा, मलई चहा, बासुंदी चहा, गुलाबी चहा, लेमन चहा, ग्रीन चहा, इराणी चहा, बदाम पिस्ता चहा, कॉफी अशा विविध प्रकारच्या चहाची मागणी वाढत आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

चहासाठी लागणारे दुध, चहा पावडर, साखर, गुळ, गवती चहा, आद्रक, वेलदोडे, चहा मसाल्याची मागणी वाढली आहे. चहाच्या प्रत्येक टपरीवर, हॉटेलमध्ये वेगवेगळे दर आहेत. फेब्रुवारी महिन्यापर्यंत असेच वातावरण राहिल्यास यंदा चहा विक्रेत्यांना चांगले पैसे मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

"दोन दिवसांपासून वातावरणात बदल व थंडी असल्यामुळे दिवसभर ग्राहकांची चहाला मागणी असते. थंडीत तरतरी आणि कडक चहाला मागणी जास्त आहे. नेहमीपेक्षा चहा पिणाऱ्यांची संख्या सध्या सर्वाधिक आहे. जवळपास ३० ते ४० टक्के ग्राहक वाढले आहेत."

- बंटी देसले, धनदाई टी- स्टॉल, झोडगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT