बातमी दोन कॉलमातच वापरणे
------------
SNR26B22989
सिन्नर ः गोंदेश्वर मंदिराच्या स्थापत्यशैलीची माहिती घेताना डॉ. नरेंद्र पाठक, डॉ. अरुण ठोके. समवेत साहित्य परिषदेचे पदाधिकारी.
------------------------
गोंदेश्वराच्या स्थापत्यशैलीचा
पाहणीत उलगडला इतिहास
--------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.७ ः प्राचीन स्थापत्य व शिल्पपरंपरेचा अद्भुत आविष्कार असलेल्या ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिराच्या स्थापत्य, शिल्पवैभव आणि इतिहासाचा प्रत्यक्ष स्थळभेटीतून अभ्यास करण्याच्या उद्देशाने ‘गोंदेश्वर मंदिर दर्शन- स्वरूप, प्रत्यक्ष स्थळभेट व चर्चात्मक संवाद’ उपक्रम पार पडला. साहित्य भारती आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.
गोंदेश्वर मंदिराचे अभ्यासक प्रा. जावेद शेख यांनी मंदिर परिसरात स्थापत्य व शिल्पवैभव उलगडून सांगितले. गोंदेश्वर मंदिराची भूमिज स्थापत्यशैली, पंचायतन मंदिर संकल्पना, नागर व द्रविड स्थापत्यशैलीतील घटकांचा झालेला मिलाफ तसेच मंदिराच्या विविध स्थापत्य वैशिष्ट्यांची त्यांनी सविस्तर माहिती दिली.
मंदिराच्या शिल्पवैभवाची माहिती देताना प्रा. शेख यांनी रामायणातील प्रसंगांची शिल्पमालिका, विविध देव-देवतांची शिल्पे, वैशिष्ट्यपूर्ण शिल्परचना आणि मंदिराच्या स्थापत्यातील बारकावे प्रत्यक्ष शिल्पे दाखवत स्पष्ट केले. त्यामुळे उपस्थितांना केवळ पुस्तकातून नव्हे, तर प्रत्यक्ष स्थळावर शिल्पांचा संदर्भ समजून घेण्याची संधी मिळाली.
गोंदेश्वर मंदिराच्या रचनेमागील पंचायतन संकल्पना, स्थापत्यशैलीतील वैशिष्ट्ये आणि शिल्पांमधून व्यक्त होणारी सांस्कृतिक व धार्मिक परंपरा यांवर सखोल चर्चा झाली. मंदिर पाहताना शिल्पांचे अर्थ व संदर्भ समजून सांगण्यात आले. मंदिराचा इतिहास, स्थापत्यशैली आणि शिल्पवैभव यासंदर्भात प्रा. शेख यांच्याशी चर्चात्मक संवाद साधला. चर्चासत्रात साहित्य अकादमी दिल्ली कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. नरेंद्र पाठक, प्रादेशिक सचिव डॉ. अरुण ठोके, कवी किरण भावसार, प्रा. राजाराम मुंगसे, रवींद्र कांगणे, शाहीर स्वप्नील डुंबरे, सोमनाथ एखंडे, वृक्षमित्र विष्णू वाघ, सुनीता वाळुंज, देवा थोरात आदी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.