फोटो-23036
सिन्नर ः पुरातन गोंदेश्वर मंदिर.
गोंदेश्वर मंदिराच्या दुरुस्तीसाठी दहा कोटी
खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नांना यश
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. ११ ः सिन्नरच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या गोंदेश्वर मंदिराच्या संवर्धन आणि परिसर विकासासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे निधीची मागणी केली होती. त्यास प्रतिसाद देत राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मंदिराच्या संरचनात्मक दुरुस्तीपासून भाविकांसाठीच्या सुविधांपर्यंत विविध उपाययोजनांची माहिती विभागाचे महासंचालक यादविर सिंह रावत यांनी पत्रातून दिली. गोंदेश्वर मंदिराच्या शिखरासह नंदी मंडप, मुख्य मंदिराच्या संरचनात्मक दुरुस्तीसाठी तांत्रिक अंदाजपत्रक अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कामे २०२६-२७ मध्ये हाती घेण्यात येणार आहेत.
मंदिराचे आकर्षण असलेल्या सूर्याभिषेकाच्या वैशिष्ट्याचे संरक्षण करण्यासाठी मंदिराच्या संरक्षित हद्दीपासून १०० मीटरचा प्रतिबंधित परिसर आणि त्यापुढील २०० मीटरचा नियंत्रित परिसर यातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. पायवाटा, पाणीपुरवठा आणि परिसर सुशोभीकरण, मंदिराचा इतिहास, स्थापत्यशैली आणि सूर्याभिषेकाचे वैशिष्ट्य यांची माहिती देणारे सांस्कृतिक माहिती फलक लावण्यात येणार आहे. मंदिराच्या संवर्धनासाठी प्रस्तावित कामे वेळेत सुरू होणे, निधी प्रत्यक्ष उपलब्ध होणे आणि कामांचा दर्जा कायम राखणे या बाबींवर भर देण्यात येणार आहे. भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या कामांची प्रभावी अंमलबजावणी पुरातत्व विभागाकडून होणे अपेक्षित आहे.
...........
कोट
हा ऐतिहासिक वारसा जतन होणे आवश्यक आहे. आश्वासनांपुरते न थांबता मंजूर निधी प्रत्यक्ष उपलब्ध होऊन संवर्धनाची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी आता पाठपुरावा सुरू राहील.
---- राजाभाऊ वाजे, खासदार
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.