नाशिक

गोंडगाव शाळेत महिला शिक्षिकेची नेमणूक करा - पालकांची मागणी संस्थाचालकांचे दुर्लक्ष : मुलींची सुरक्षितता धोक्यात

CD
गोंडगाव शाळेत शिक्षिका नियुक्त करावी पालकांची मागणी; संस्थाचालकांचे दुर्लक्ष, विद्यार्थिनींची सुरक्षितता धोक्यात सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. २७ ः गोंडगाव (ता. भडगाव) येथील राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात महिला शिक्षिकेची नियुक्ती करावी, अशी मागणी सरपंच राहुल पाटील यांच्यासह पालकांनी संस्थेचे चेअरमन डॉ. विनायक चव्हाण यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात मुख्याध्यापक बी. जी. नन्नावरे हे पालकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असून मागणीचा पाठपुरावा करीत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. संस्थेच्या वाडे व कनाशी (ता. भडगाव) या गावातील शाळेत महिला शिक्षिका नियुक्त आहेत. मात्र, गोंडगावला एकही शिक्षिका नाही. काही गावात चार ते पाच महिला एकाच शाळेवर नियुक्त असताना गोंडगावला महिला शिक्षिकेची नियुक्ती का केलेली नाही? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. गोंडगावची शाळा गावाबाहेर असून आजूबाजूला शेती आहे. अशा शाळेत मुली शिक्षणासाठी येत असताना त्यांच्याही अनेक समस्या असतात. मात्र, शिक्षिकाच नसल्याने मुली अनेकदा भीतीपोटी शिक्षकांना आपल्या समस्या सांगू शकत नाही. नियुक्ती, कामकाज वेगवेगळे संस्थेचा कारभार गेल्या काही दिवसांपासून विचित्र झाला आहे. शिक्षकांची मूळ स्थापना दुसरीकडे तर त्यांचा पगार निघतो तिसरीकडे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांशी काहीही घेणे देणे दिसत नाही. संस्थाचालकांच्या सोयीच्या राजकारणात विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, गावाबाहेर असलेल्या गोंडगाव शाळाच्या काही अंतरावर मुलींच्या शौचालयाची सोय आहे. मात्र, त्या ठिकाणी छताच्या भागावर स्लॅबच नाही. आजूबाजूला संपूर्ण शेती आहे. अशाच शाळेत महिला शिक्षिका नसल्याने मुलींची सुरक्षितता धोक्यात दिसून येत आहे. --------------------- कोट गोंडगावच्या शाळेत सध्या महिला शिक्षक नियुक्त नसल्याचे वास्तव आहे. शासनाकडून भरतीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाल्यानंतर तत्काळ महिला शिक्षकांची नियुक्ती गोंडगाव शाळेवर केली जाईल. - डॉ. विनायक चव्हाण, चेअरमन ः राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ, चाळीसगाव. -----------------------पूर्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझे वडील गेलेत...' राम पूर्णेकर ओक्साबोक्शी रडले; पोलिसांनी बळजबरीने रिक्षात कोंबलं; ठाण्यात काय घडलं?

नागपूर पदवीधर निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत २१ अपक्ष उमेदवारांचं आंदोलन; आयोगाविरोधात घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

Sugar Price Hike: दिवाळीपूर्वीच साखरेचे दर भडकले! पुण्यात किलोमागे 5 रुपयांची वाढ; एक किलो कितीला? दर आणखी वाढणार?

Latest Marathi News Live Update : जालन्यातील घुंगर्डे हदगावमध्ये लहान भावानेच केली मोठ्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

ABHISHEK SHARMA: अभिषेक शर्माचा ३५ चेंडूंत शतकी धमाका! सूर्यकुमार यादवची बरोबरी, आता रोहित शर्माचा विक्रम मोडण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT