Monsoon Rain Latest News esakal
नाशिक

इगतपुरीसह त्र्यंबकेश्‍वर अन पेठमध्ये चांगला पाऊस

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मॉन्सूनने (Monsoon) इगतपुरीसह त्र्यंबकेश्‍वर अन पेठ या आदिवासी तालुक्यात गेल्या २४ तासात चांगली हजेरी लावली. इगतपुरीमध्ये ५०.६, पेठमध्ये ४५.४, तर त्र्यंबकेश्‍वरमध्ये ५३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्‍वरमध्ये बुधवारी (ता. ६) रात्रीपासून पाऊस सुरु झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ७९.४ टक्के पाऊस झाला असून जिल्ह्यातील धरण साठ्यात २ टक्क्यांनी वाढ होऊन धरणसाठा २६ टक्क्यांपर्यंत पोचला. (Good rain in Trimbakeshwar and Peth including Igatpuri Nashik News)

इगतपुरी तालुक्यात या आठवड्यात वरुणराजा मेहरबानी करत असला, तरीही जोरदार पावसाची प्रतीक्षा या तालुक्याला कायम आहे. इगतपुरीमध्ये अजूनही ५० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे ३६.१ टक्के पाऊस झाला आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात तालुकानिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : मालेगाव-७, बागलाण-८.६, कळवण-३.१, नांदगाव-०.४, सुरगाणा-१२.७, नाशिक-१६.६, दिंडोरी-१०.१, निफाड-३.६, सिन्नर-४.४, येवला-६.२, चांदवड-३, देवळा-०.१.

६ तालुक्यात ‘डबल डिजीट' पाऊस

जिल्ह्यातील इगतपुरीसह सुरगाणा, नाशिक, पेठ, येवला, त्र्यंबकेश्‍वर या सहा तालुक्यात अद्याप ‘डबल डिजीट'मध्ये पावसाची टक्केवारी राहिली आहे. तालुकानिहाय झालेल्या पावसाची टक्केवारी याप्रमाणे : सुरगाणा-५९, नाशिक-६९.७, पेठ-७७.३, येवला-६०.२, त्र्यंबकेश्‍वर-५८.८. इतर तालुक्यातील झालेल्या पावसाची टक्केवारी अशी : मालेगाव-१७०.८, बागलाण-११३.९, कळवण-१०५.८, नांदगाव-१३३.८, दिंडोरी-१०७.९, निफाड-९९.४, सिन्नर-१००.३, चांदवड-१६६.१, देवळा-१२७.१.

धरणसाठ्याची स्थिती (आकडे टक्क्यांमध्ये)

धरण समूह जलसाठा

गंगापूर २२

पालखेड १३

ओझरखेड २०

दारणा २९

गिरणा ३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT