SAKAL Anniversary esakal
नाशिक

SAKAL Anniversary : वर्धापन दिनी ‘सकाळ’वर शुभेच्‍छांचा वर्षाव! शैक्षणिक साहित्‍याच्‍या मदतीसाठी सरसावले वाचक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘सकाळ’‍ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीच्‍या ३४ व्‍या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी कोसळणाऱ्या भरपावसात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘सकाळ’च्या सातपूर कार्यालयात स्नेहमेळावा व पानसुपारीचा कार्यक्रम झाला.

रात्री उशिरापर्यंत शुभेच्‍छांचा ओघ सुरू राहिला. विविध क्षेत्रातील मान्‍यवरांनी सदिच्‍छा भेट देताना ‘सकाळ’विषयीचा प्रेमभाव व्‍यक्‍त केला. आवाहनाला प्रतिसाद देताना गरजू विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी साहित्‍य आणत या कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. (Good wishes showered on SAKAL uttar maharashtra edition 34th Anniversary Reached out for help with educational materials nashik news)

‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक संपादक श्रीराम पवार, उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी सदिच्‍छा स्‍वीकारल्‍या. केंद्रीय आरोग्‍य राज्‍यमंत्री डॉ. भारती पवार, शिवसेनेचे ज्‍येष्ठ नेते तथा खासदार संजय राऊत, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले,

विभागीय आयुक्‍त राधाकृष्ण गमे, आदिवासी विकास आयुक्‍त नयना गुंडे, महापालिका आयुक्‍त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सहाय्यक कामगार आयुक्‍त सुजित शिर्के,

‘एमआयडी’चे विभागीय अधिकारी नितीन गवळी, निवासी उपजिल्‍हाधिकारी भागवत डोईफोडे, मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्‍वासराव मोरे, स्‍वामी श्रीकंठानंद, ज्‍येष्ठ उद्योजक अशोक कटारिया, हेमंत राठी, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांसह प्रशासकीस, राजकीय, शैक्षणिक, सांस्‍कृतिक, सामाजिक, क्रीडा आदी विविध क्षेत्रांसह तनिष्का सदस्‍या, ‘यिन’चे पदाधिकारी, सदस्य व शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संस्थांच्या पदाधिकारी ‍यांसह खो-खोच्‍या राष्ट्रीय खेळाडू आणि वाचकांनी उत्‍स्‍फूर्त हजेरी लावताना ‘सकाळ’ला शुभेच्‍छा दिल्‍या.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

सामाजिक बांधिलकीचे घडविले दर्शन

भेटवस्‍तू अथवा पुष्पगुच्‍छ न आणता गरजू विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी साहित्‍य देण्याचे आवाहन ‘सकाळ’तर्फे करण्यात आले होते.

त्‍यास प्रतिसाद देताना अगदी एका वहीपासून तर संपूर्ण शैक्षणिक साहित्‍याने भरलेली पिशवी भेट म्‍हणून आणत वाचक, मान्‍यवरांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. वर्धापन दिनानिमित्त संकलित झालेले शैक्षणिक साहित्‍य गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोचविले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT