नाशिक

शिरपूर : खासदारांकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी

CD
SHC26B13545 वरझडी (ता. शिरपूर) : पिकांची पाहणी करताना खासदार गोवाल पाडवी व सहकारी. --------- दुष्काळग्रस्तांना एकरी एक लाख द्या खासदार गोवाल पाडवी यांची मागणी सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २६ : नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे खासदार गोवाल पाडवी यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना २५ ऑक्टोबरला विविध गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला. वरझडी गावातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली. वरझडी गावातील सुमारे ७० ते ८० टक्के ग्रामस्थ रोजगारासाठी स्थलांतरित झाल्याने अनेक घरांना कुलूप असल्याचे चित्र दिसून आले. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना दुष्काळाचा मोठा फटका बसला असून, रोजगाराअभावी अनेकांना गाव सोडावे लागले आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून, शेतकरी आणि शेतमजुरांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने आर्थिक मदत देऊन दुष्काळग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी पाडवी यांनी केली. या वेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी कैलास गोपाळ, मंडल कृषी अधिकारी शुभम शिरसाट, उपकृषी अधिकारी दीपक पाटील, सहायक कृषी अधिकारी अविनाश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी किरण गिरवले, योगेश वारूळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. विजय तिवारी, गेंद्या पावरा, अत्तरसिंग पावरा, भरत राजपूत, मनोज पावरा, विलास पावरा, शिवाजी पावरा, जुनेद पठाण, संजय पावरा यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. ----- मृत बालकाच्या कुटुंबाचे सांत्वन बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या बालकाच्या कुटुंबाचीही खासदार पाडवी यांनी भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाच्या बचाव मोहिमेला अधिक सक्षम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वनविभागाला स्वतंत्र आणि सुसज्ज वाहन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-नेदरलॅंड्स व्यापार दुप्पट होणार; डच परराष्ट्र व्यापारमंत्री स्जूर्ड्समा यांची अपेक्षा

Piyush Goyal : समुद्राला बांध घालणाऱ्या डचांसमोर गोयलांनी मांडला 'भारत' नावाचा ब्रँड

Maharashtra Live News: गोर बंजारा आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात मांडण्याची मागणी

Talegaon Dhamdhere News : सह हिस्सेदारांच्या संमतीची अट अन्यायकारक; तळेगावात दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे काम ठप्प

नोव्हेंबरमध्ये या ५ राशींवर महालक्ष्मीची विशेष कृपा! पैशांचा पाऊस पडणार, मोठ्या धनलाभासह मिळणार अनेक फायदे

SCROLL FOR NEXT