Bike rider injured after being hit by a bus at City Center Mall Chowk. esakal
नाशिक

Nashik Accident News: फोन करूनही शासकीय रुग्णवाहिका मिळालीच नाही!

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : उंटवाडी सिटी सेंटर मॉल येथे भरधाव बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले.

तर वेळेवर १०८ क्रमांकावर फोन करूनही शासकीय रुग्णवाहिकेची मदत वेळेवर न मिळाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. (Government Ambulance not received even after calling after accident at city center mall Nashik News)

शुक्रवारी (ता. ७) दुपारी दुचाकीहून प्रवास करणाऱ्या युवकांना भरधाव बसने धडक दिल्यानंतर गंभीर जखमी असलेल्या अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्याकरिता नागरिकांनी १०८ क्रमांकावर तत्काळ फोन केला.

मात्र अपघातग्रस्तांना मदत करण्याकरिता शासकीय रुग्णवाहिका आलीच नाही. तर फोनवर बोलणाऱ्या महाशयांनी रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

काही जागृत नागरिकांनी सरकारी रुग्णवाहिका येत नसल्याचे लक्षात घेऊन खासगी रुग्णवाहिका बोलावून घेत यातून जखमी युवकांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अपघात झाला होता तेथून अवघ्या काही मिनिटांच्याच अंतरावर शासकीय जिल्हा रुग्णालय असूनही असे प्रकार घडत असतील तर इतर अपघातग्रस्तांना खरंच मदत होत असेल का, असा आरोप नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

"बसने जोरदार धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात भरती करण्याकरिता १०८ क्रमांक रुग्णवाहिकेची मदत मागितली. मात्र मदत मिळालीच नाही. अपघात झालेल्या घटनास्थळावरून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर जिल्हा शासकीय रुग्णालय असून शासकीय रुग्णवाहिका तत्काळ मिळाली नाही. हे प्रशासकीय यंत्रणेचे अपयश म्हणावे लागेल." - दर्शन बोरसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT