नाशिक

जनजाती गौरव सेवा सप्ताहानिमित्त विविध दाखल्यांचे वाटप

CD
NSK26H35177 धानोरा : पात्र लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करताना आमदार डॉ. विजयकुमार गावित. शेजारी डॉ. सुप्रिया गावित, संतोष डेरे, अर्चना वाघमळे. --- धानोरा येथे दाखल्यांचे वाटप शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : आमदार डॉ. गावित सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १७ : क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजातीय गौरव सेवा सप्ताहनिमित्त धानोरा येथे विशेष शिबिर घेण्यात आले. आमदार डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करून योजनांच्या लाभासाठी अर्ज भरून घेण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांना आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेयर, रहिवास, अधिवास दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र यांसह विविध कागदपत्रे पूर्ण करून वितरित करण्यात आले. शिबिराला तहसीलदार संतोष डेरे, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, नायब तहसीलदार प्रांजल पाटील, धानोरा येथील राजकीय पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, की पिवळ्या आणि केसरी कार्डधारकांना पूर्वी शासकीय स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत होते. परंतु विभाजन केल्यामुळे त्यांच्यापैकी पांढरे कार्डधारकांना धान्य मिळणे बंद झाले. त्यांनी त्यांचे जुने आणि नवीन रेशन कार्ड सादर केले तर त्या कार्डधारकांना पुन्हा धान्य मिळणे सुरू होईल. ग्रामीण जनतेने याचा लाभ घ्यावा. डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या, की दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाही शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. सध्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रीम मदत दिली जात असून, पात्र शेतकऱ्यांना मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक नोंदणी व पडताळणी प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचे आहे. प्रत्येकाने ती प्रक्रिया करून घ्यावी. दरम्यान, शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची माहिती शिबिरात देण्यात आली. विविध विभागाकडून योजनांच्या लाभाची प्रमाणपत्रे आमदार डॉ. गावित यांच्या व डॉ. सुप्रिया गावित यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : "तुम्ही खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाही"; वकिलाचे CJI सूर्यकांत यांना भर कोर्टात खडे बोल, आता होणार फौजदारी कारवाई?

एमएस धोनी IPL मधून निवृत्त! CSK कडून मोठी घोषणा, आता दिसणार या भूमिकेत

Accident News: तिघांना उडवून कार खड्ड्यात कोसळली ;एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी ; खापरी शिवारातील घटना

Maharashtra: वारसा संवर्धनासोबत स्वच्छताही महत्त्वाची! संरक्षित स्मारकांजवळ शौचालयांना मुंबई उच्च न्यायालयाची मंजुरी

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरात वाढणार ‘अक्वान’ चक्रीवादळाची तीव्रता वाढणार; २० नोव्हेंबरला आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT