Government directives to Anganwadi children will get strike time food nashik  esakal
नाशिक

Nashik Anganwadi News : अंगणवाडी बालकांना मिळणार संप काळातील आहार; शासनाचे निर्देश

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तब्बल ५३ दिवसांनंतर मिटला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Anganwadi News : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तब्बल ५३ दिवसांनंतर मिटला आहे.

संप मिटला असला तरी, संप काळात अंगणवाड्यांमधील बालके आहारापासून वंचित राहिले होते. त्यासाठी शासनाने आता संप काळातील आहार यात अर्थात कच्चे धान्य, किराणा हा अंगणवाडीतील बालकांना देण्याचे निर्देश दिले आहेत. (Government directives to Anganwadi children will get strike time food nashik news)

त्यानुसार, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविकांमार्फत धान्य वितरणाबाबतचे आदेश दिल्याची माहिती महिला बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांनी दिले.

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी प्रलंबित मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून आंदोलन सुरू केले होते. राज्य शासन आणि आंदोलनकर्त्यांमधील चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्याने आंदोलन लांबले होते. त्यामुळे मागील दीड महिन्यापेक्षा अधिक काळ अंगणवाड्यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांना शिजवून दिला जाणारे ताजे अन्न मिळालेच नाही.

तसेच स्तनदा, गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या सुक्या आहाराच्या पाकिटांचेही वाटप रखडले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, निवृत्तिवेतन, ग्रॅच्युइटी आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील ४ हजार २४९ अंगणवाडी सेविका, ४८५ मिनी अंगणवाडी सेविका आणि ४ हजार ३४६ मदतनीस राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी झाल्याने स्तनदा माता व बालकांच्या पोषणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

बालकांना असा मिळतो आहार

सकाळचा नाश्ता - प्रति दिन गहू (४० ग्रॅम), साखर/गूळ (८ ग्रॅम), सोयाबीन तेल (३ मिली) दुपारचे जेवण-प्रति दिन चना/चवळी/वाटाणा (२४ ग्रॅम), मूगदाळ/मसूरडाळ/तूरडाळ ((१० ग्रॅम), तांदूळ (३८ ग्रॅम), मिरची पावडर (२ ग्रॅम), हळद पावडर (२ ग्रॅम), मीठ (४ ग्रॅम), सोयाबीन तेल (७ मिली).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT