Government Employees Strike esakal
नाशिक

Government Employees Strike : यापुढे संपात उतरला तर वेतनामध्ये कपात : संपकाळातील वेतनावर निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Government Employees Strike : मागील महिन्यात राज्य सरकारी कर्मचारींनी पुकारलेल्या संपाच्या सात दिवसांचे कालावधी आसाधारण रजा समजण्याचा आदेश मागे घेत शासनाने आज सायंकाळी संबधित संपाच्या दिवसापोटी अर्जित रजाच्या मोबदल्यात आर्थिक नुकसान टाळले आहे.

मात्र, त्यात, पुर्वोदाहरणाच्या अटीवर अर्थात यापुढे अशी चूक करणार नाही या अटीवर कर्मचारींची विनंती मान्य केली आहे. यामुळे यापुढे संपात उतरलात तर वेतनकपात निश्‍चित आहे. (Government Employees Strike Reduction in Wages Further Strike Decision on Wages During Strike nashik news)

संपकाळातील सुट्यांच्या दिवसाचा मोबदला द्यायचा नाही अशी भूमिका घेत, शासनाने संपाच्या दिवसांची गणना ‘असाधारण रजा‘ म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला होता, त्याला कामगार संघटनांनी विरोध दर्शविला. मात्र शासनाकडून प्रतिसाद मिळत नव्हता.

अखेर आज सायंकाळी कामगार संघटनांची विनंती मान्य करीत शासनाने संप काळातील दिवसात काम न केलेल्या सात दिवसांचे वेतन हवे असल्यास शिल्लक असलेल्या रजाच्या मोबदल्यात (अर्जित रजा घेउन) वेतन करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे आज सकाळपासून वेतनाची बिल काढण्याची प्रक्रिया सुरु करीत, सायंकाळी शासनाने आदेश काढला. येत्या दोन दिवसांत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन जमा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

अट ठेऊनच आदेश

शासनाने संप काळातील काम न केलेल्या दिवसांपोटी अर्जित रजा भरुन देण्याचा कामगारांचा पर्याय स्वीकारला असला तरी, शासन आदेशात एक विशेष बाब म्हणून पूर्वोदाहरण होणार नाही, म्हणजे यापुढे अशी चूक होणार नाही अशी अट टाकून कामगारांना अर्जित रजा भरण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

विशेष बाब म्हणून अर्जित रजा मंजूर केली आहे. म्‍हणजेच आता संपात उतरु नका नाही तर ...वेतन मिळणार नाही असाच आज सायंकाळी निघालेल्या शासकीय आदेशाचा अर्थ लावला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT