Government Employees Strike esakal
नाशिक

Government Employees Strike: सण-उत्सवात शासकीय कर्मचारी वेतनाविनाच! संपातील 7 दिवसांबाबत निर्णय होईना

सकाळ वृत्तसेवा

Government Employees Strike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप काळातील सात दिवसांचे वेतन द्यायचे की नाही या विषयी आज सायंकाळपर्यतही निर्णय होवू शकला नाही. त्यामुळे राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्याचा पगार झालेला नाही.

समजा, उद्या निर्णय झालाच तरी परवा शुक्रवार (ता.१४) पासून सलग तीन दिवस सुट्या असल्याने कर्मचाऱ्यांना वेतन मिळायला पुढील आठवडा उजाडणार आहे.

एकूणच यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला कर्मचारी वेतनाविनाच राहणार असल्याचे चित्र आहे. (Government employees without salary during festivals No decision regarding 7 days of strike nashik news)

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. सलग सात दिवसांच्या संपामुळे कामकाजावर परिणाम होऊन शासनाने संप काळातील काम न केलेल्या दिवसांचे वेतन न देण्याचा निर्णय घेतला.

तर कामगार संघटनांनी मात्र संप काळातील काम न केलेल्या दिवसांचे वेतन मिळण्याचा आग्रह धरला आहे. या सगळ्यास विषयावर एकमत होत नसल्याने अखेर संबंधित दिवसांच्या असाधारण रजा समजून त्यांचा निवृत्तीवेतनाशी संबंध न जोडण्याचा निर्णय आहे.

तर अनेक कामगारांनी अर्जित रजा तसेच संचित रजापैकी शिल्लक रजा भरून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामगार संघटना संपकाळातील दिवसांच्या वेतनासाठी ठाम असल्याने कर्मचाऱ्यांनीही संप काळातील काम न केलेल्या दिवसांचे वेतन मिळणार असे गृहीत धरले.

परिणामी, त्या दिवसांच्या वेतनाचा विषय मार्गी लागत नसल्याने अजूनपर्यत संपातील त्या सात दिवसांच्या वेतनाबाबत निर्णय झालेला नाही आणि कर्मचाऱ्यांचे वेतनही झाले नाही.


हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

वेतनाला पुढील आठवडा उजाडणार

संप काळातील सात दिवसांच्या वेतनाबाबत आजही निर्णय झाला नाही. निर्णयच झाला नाही म्हणून आज वेतनाबाबत आदेशही निघाला नाही. उद्या गुरुवारी (ता.१३) सात दिवसांच्या वेतनाबाबत निर्णय झाला तरी लागलीच उद्याच कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होणार नाही.

त्यानंतर शुक्रवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तमाम आंबेडकर प्रेमीसाठी डॉ. आंबेडकर जयंती म्हणजे सण असतो. एका बाजूला सणासाठी शासनाकडून आनंदाचा शिधा देण्याचे नियोजन असतांना दुसरीकडे मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनही नाही अशी स्थिती असेल.

त्यामुळे पुढील आठवड्यात सोमवारी बिल तयार होतील. मंगळवारी कोषागारात बिल सादर होतील त्यानंतर यथावकाश वेतन जमा होणार आहे. एकूणच सण उत्सवात सरकारी कर्मचारी मात्र वेतनाविनाच राहणार असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT