NSK26H32555
मुक्ताईनगर : पंचायत समितीत आढावा घेताना मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर. शेजारी गटविकास अधिकारी कीर्ती कानवाडे.
---
घरकुल योजनांच्या कामांना गती द्या
(उपशीर्षक)
मुक्ताईनगर पंचायत समितीस भेटीदरम्यान सीईओंचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा. घरकुल योजनांच्या कामांना गती द्या, तसेच प्रत्येक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी निर्देश दिले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी गुरुवारी (ता.१५) मुक्ताईनगर पंचायत समितीस भेट देऊन घरकुल योजनांसह मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि सेवा संकल्प अभियानाच्या कामकाजाचा आढावा घेतला. विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. या भेटीदरम्यान गटविकास अधिकारी कीर्ती कानवाडे उपस्थित होत्या.
ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. घरकुलांची प्रलंबित कामे पूर्ण करणे, लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करणे आणि कामांच्या प्रगतीवर नियमित लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
चौकट
ग्रामविकासाला चालना
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सक्षम करा. गावांमध्ये विकासाभिमुख उपक्रम राबविणे आणि लोकसहभाग वाढविणे, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. अभियानांतर्गत निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.