नाशिक

शासकीय कार्यालयांमध्ये दिवाळी फिव्हर कायम

CD
शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट --- दिवाळी फिव्हर कायम; सोमवारीच कामकाज पूर्वपदावर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : दिवाळीच्या सलग पाच दिवसांच्या सुट्यानंतर गुरुवार (ता. १२)पासून शासकीय कार्यालये खुली झाली. पण, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नगण्य संख्या, तसेच सर्वसामान्यांनीही पाठ फिरविल्याने कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. दरम्यान, सोमवार (ता. १६)पासूनच कार्यालयांचे कामकाज पूर्वपदावर येईल. यंदा वीकेंड तसेच दिवाळीच्या सलग सुट्यांनंतर गुरुवारी शासकीय-निमशासकीय कार्यालयांची प्रवेशद्वारे उघडली. मात्र, जवळपास सर्वच कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती बोटावर मोजण्याइतपत पाहायला मिळाली. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातही वेगळे चित्र नव्हते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे त्यांच्या दालनात उपस्थित असले, तरी बहुतांश विभागांत अधिकारी आणि कर्मचारी रजेवर होते. ग्रामीण भागातून कामे घेऊन येणाऱ्या जनतेने दिवाळीचा फिव्हर लक्षात घेत मुख्यालयी येणे टाळले. त्यामुळे एरवी गजबजणाऱ्या कार्यालयात शुकशुकाट नजरेस पडत होता. नाशिक महापालिका, जिल्हा परिषद, आदिवासी विकास आयुक्तालय, भूमी-अभिलेखसह नागरिकांचा कायम संपर्क येणाऱ्या विविध कार्यालयांमध्येही अपेक्षेप्रमाणे गर्दी पाहायला मिळाली नाही. दरम्यान, शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये शुक्रवारी (ता. १३) कामकाज सुरू राहणार आहे. मात्र, त्यानंतर लगेचच पुढील दोन दिवस वीकेंडच्या सुट्या आहेत. त्यामुळे बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रजा काढली. परिणामी, सोमवारपासून शासकीय-निमशासकीय कार्यालयांचे कामकाज पूर्वपदावर येईल. फाईलींचा प्रवास रखडला जिल्हाधिकारी कार्यालयातील काही विभागांमध्ये अधिकाऱ्यांसमोर फाईली पडून होत्या. परंतु, बहुतांश फाईलींबाबत माहिती देण्यासाठी कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दुपारपर्यंत हातातील काम पूर्ण करून सायंकाळी पाच ते साडेपाचदरम्यान घराकडची वाट धरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

Pune News : पुणे महापालिका बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची शक्यता सतेज पाटलांनी फेटाळली; "मला १०० टक्के खात्री आहे, विलीनीकरण होणार नाही"

SCROLL FOR NEXT