नाशिक

आपले सरकार पोर्टलचा सावळागोंधळ! सर्व्हर डाऊनमुळे नागरिक हैराण; प्रशासनाचे दुर्लक्ष की नियोजनाचा अभाव?

CD
पान-२ सेकंडे मेन नाव-दुरुस्ती, बदलासह विविध कामे रखडली ----------- आपलं सरकार पोर्टलला सर्व्हर डाऊनचा फटका ः प्रशासनाचे दुर्लक्ष, उपाययोजनेची मागणी ------------ सकाळ वृत्तसेवा घोटी, ता.२२ ः आपले सरकार पोर्टलचे सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. १६ आॅक्टोबरपासून सर्व्हर डाऊन असल्याने विविध शासकीय कामे रखडली आहेत. विशेष म्हणजे, नावात बदल आणि आडनावात दुरुस्ती करण्याची सेवाही मागील दोन महिन्यांपासून बंद असल्याची नागरिकांची तक्रार आहे. विविध शासकीय दाखले, शिधापत्रिका, प्रतिज्ञापत्रे (ॲफिडेव्हिट) आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी नागरिक सेतू व आपले सरकार केंद्रांवर चकरा मारत आहेत. मात्र, सर्व्हर काही काळ सुरू होतो आणि पुन्हा बंद पडतो. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात असून, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहेत. १६-१ ‘सर्व्हर अपग्रेड सुरू आहे’ नागरिकांनी ई- मेल आणि टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करूनही ‘सर्व्हर अपग्रेडचे काम सुरू आहे’ असे उत्तर मिळत असल्याचे सांगितले जाते. अपग्रेडसाठी नेमका किती कालावधी लागणार, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. सुट्ट्यांमध्ये कामकाज होत नसेल आणि कामकाजाच्या दिवशीही सेवा बंद राहत असेल, तर नागरिकांनी शासकीय कामे पूर्ण कशी करावीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. १६-१ सेतू चालकांवरच रोष व्यक्त सर्व्हर बंद असल्यामुळे सेतू केंद्र चालकांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अर्जांची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने नागरिक आणि केंद्र चालकांमध्ये वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत. मात्र, या समस्येवर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाने सर्व्हर बंद पडण्याचे कारण स्पष्ट करून सेवा पूर्ववत होण्याची निश्चित वेळ जाहीर करावी. पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देत तांत्रिक समस्या कायमस्वरूपी सोडवावी. केवळ आश्वासने न देता नागरिकांची गैरसोय थांबवण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी गुड न्यूज? आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! थकबाकीबाबतही उत्सुकता

Diwali Furniture Polishing Tips: दिवाळीच्याआधी लाकडी फर्निचर चमकवायचंय? घरातल्याच 'या' वस्तू येतील उपयोगी

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

MBBSच्या विद्यार्थ्यांना दिलासा! अतिरिक्त परीक्षेची संधी; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा मोठा निर्णय

SANJU SAMSON RECORD: जगात भारी संजू सॅमसनचा विक्रम! जोस बटलरला मागे टाकत २००+ स्ट्राइक रेटने नवा विक्रम;T20 क्रिकेटमध्ये बनला नंबर वन!

SCROLL FOR NEXT