Silk Market File Photo esakal
नाशिक

Nashik News : येवल्यात शासकीय रेशीम कोष खुली बाजारपेठ; भुजबळांचे प्रयत्न

शासनाच्या एकात्मिक व शास्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ -२८ अंतर्गत शहरात शासकीय रेशीम कोष बाजारपेठ निर्माण करण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

येवला : शासनाच्या एकात्मिक व शास्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ -२८ अंतर्गत शहरात शासकीय रेशीम कोष बाजारपेठ निर्माण करण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे.

या बाजारपेठेमुळे येवल्यातील वस्त्रोउद्योगाला अधिक चालना मिळणार आहे. येवल्यातील रेशीम शेती आणि त्यावर आधारित पूरक उद्योगांचा विकास होईल. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून ही मंजुरी मिळाली आहे. (Govt Silk Fund Open Market Bhujbal efforts Nashik News)

पैठणी उद्योगाला अधिक चालना मिळण्याच्या दृष्टीने मंत्री भुजबळ यांच्या माध्यमातून एरंडगाव येथे रेशीम पार्क उभा करण्यासाठी जागा राखीव केली आहे.

मंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मे २०२३ मध्ये पुण्याच्या प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहाय्यक संचालिका डॉ. कविता देशपांडे, नाशिकचे रेशीम विकास अधिकारी इंगळे, सारंग सोरटे यांच्या उपस्थितीत नाशिकला बैठक झाली होती.

तीत मंत्री भुजबळ यांनी येवल्यात रेशीम पार्क उभा करण्याच्या दृष्टीने प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

येवला पैठणीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. स्थानिक कारागीर घरोघरी पैठणी तयार करतात. पैठणी तयार करण्यासाठी लागणारा रेशीमधागा परराज्यातून आयात करावा लागतो.

या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे (रॉ सिल्क) उत्पादन स्थानिक पातळीवर व्हावे, यासाठी येवला येथे रेशीम पार्कची नितांत गरज आहे.

त्यानुसार राज्याच्या एकात्मिक व शास्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ -२८ अंतर्गत रेशीम शेती व त्यावर आधारित पूरक उद्योगांचा विकास करण्यासाठी तुती व टसर कोश, सूत खरेदी विक्रीसाठी खुली शासकीय बाजार व कच्च्या रेशीम एक्सचेंज स्थापन करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.

त्यानुसार येथे शासकीय कोषाची खुली बाजारपेठ निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे येवल्यातील वस्त्रोद्योगाला अधिक चालना मिळणार आहे. तुती व टसर रेशीम उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हक्काची बाजारपेठ निर्माण होऊन शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT