D Ed teachers
D Ed teachers esakal
नाशिक

Nashik News : पदवीधर डी. एड शिक्षकांच्या सेवाजेष्ठता लढ्याला यश; प्रवर्ग 'क' मध्ये समावेश

- दीपक खैरनार

अंबासन, (जि.नाशिक) : पदवीधर डी.एड, कला-क्रीडा शिक्षक-शिक्षकेतर संघाच्या लढ्याला अखेर यश मिळाले शासनाने २४ मार्च २०२३ ला तयार असणारी अधिसूचना लागू केली असून गेल्या तीन वर्षानंतर अधिसूचनेत बदल होऊन त्याचे कायद्यात रूपांतर झालेले आहे.

प्रवर्ग 'क' मध्ये दुरुस्ती करून पदवीधर डी.एड, कला, क्रीडा शिक्षकांचा समावेश प्रवर्ग'क'मध्ये केल्याने पदवीधर डी.एड शिक्षकांना  मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे. (Graduate Success in DEd Teachers Seniority Fight Included in Category C Nashik News)

खाजगी शाळांतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेसाठी महाराष्ट्र खाजगी शाळा (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम १२ अनुसूचि 'फ' मध्ये मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. त्यात माध्यमिक शाळेतील शिक्षकांची ज्येष्ठता प्रवर्गनिहाय दिलेली आहे.

सदर  प्रवर्गामध्ये पदवीधर डी.एड शिक्षकांचा समावेश नसल्याने अनेक संस्थामधे, पदवीधर डी.एड शिक्षकांना पदोन्नतीसाठी डावलले जात असायचे. यासाठी महाराष्ट्र राज्य पदवीधर डी.एड, कला-क्रीडा शिक्षक-शिक्षकेतर संघटनांच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा करून पदवीधर डी.एड शिक्षकांवर होत असलेला अन्याय निदर्शनास आणून दिला.

पदवीधर डी.एड, कला-क्रीडा शिक्षक-शिक्षकेतर संघटननी केेलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन शासनाने प्रवर्ग 'क' च्या दुरूस्तीबाबत ८ जून २०२० ला अधिसूचना निर्गमित करून हरकती मागविल्या होत्या.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

सदर अधिसूचना निर्गमित होऊनही अडीच व वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही अधिसूचनेची कार्यवाही लागू होत नसल्याने महाराष्ट्र राज्य पदवीधर डी.एड, कला-क्रीडा शिक्षक- शिक्षकेतर संघटनांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, अवर सचिव, शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी अशा उच्चपदस्थ अधिकारी व पदाधिकारी यांच्या वारंवार भेटी घेऊन निवेदने देऊन तसेच संघटनांतर्फे सुस्पष्ट अधिसूचना काढावी यासाठी पत्र आंदोलन देखील केले होते.

 "शिक्षण विभागाने अधिसूचना प्रसिध्द केल्याचा आनंद व्यक्त करून आता शक्य तितक्या लवकर कृतीत आणून अन्यायग्रस्त पदवीधर डी.एड, कला,क्रीडा शिक्षकांना न्याय द्यावा."

-लहू कोर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पदवीधर डी.एड, कला- शिक्षक संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT