SPPU Pune University esakal
नाशिक

12वीनंतर पदवी शिक्षण; पुणे विद्यापीठाच्‍या 45 हजार जागा उपलब्‍ध

अरूण मलाणी

नाशिक : इयत्ता बारावीचा निकाल (HSC Results) जाहीर होताच प्रथम वर्ष (First year) प्रवेशाची (Admission) लगबग सुरु होणार आहे. नाशिक जिल्‍हास्‍तरावर अभियांत्रिकीच्‍या (engineering) पदवी (Bachelors) अभ्यासक्रमाच्‍या सुमारे साडेसात हजार, औषधनिर्माणशास्‍त्र (Pharmacology) शाखेच्‍या सुमारे साडेचार हजार जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत (SPPU Pune) विविध पदवी अभ्यासक्रमांच्‍या मिळून सुमारे ४५ हजार जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उपलब्‍ध असणार आहेत. (graduation admission 45000 seats available at Pune University Nashik News)

बहुप्रतिक्षित बारावीचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर आता पुढील प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांकडून सुरु आहे. तर पुणे विद्यापीठ स्‍तरावरील विविध पारंपरिक अभ्यासक्रमासह शिक्षणशास्‍त्र, विधी अशा विविध अभ्यासक्रमांशी निगडित सुमारे ४५ हजार जागा नाशिक जिल्‍हास्‍तरावर उपलब्‍ध आहेत. ग्रामीण भागातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये त्‍यांच्‍या स्‍तरावर या जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. शहरातील काही महाविद्यालयात ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. दरम्‍यान निकाल जाहीर झाल्‍यानंतर १७ जूनला गुणपत्रिका वाटप केले जाणार आहे, तत्‍पूर्वी विद्यार्थ्यांनी कागदपत्र सज्‍ज ठेवणेदेखील आवश्‍यक आहे.

वैद्यकीय शिक्षणाच्‍या संधी

उत्तीर्णांपैकी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना नीट परीक्षेच्‍या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणाचा पर्यायदेखील खुला राहणार आहे. याअंतर्गत एमबीबीएस, बीडीएस यांसह बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, फिजिओथेरपी, बी.एस्सी. (नर्सिंग) अशा वैद्यकीय शिक्षणक्रमांना प्रवेशाचा मार्ग नीट परीक्षेच्‍या कामगिरीच्‍या आधारे खुला होणार आहे.

मुक्‍त विद्यापीठात शिक्षणक्रम

विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांसाठी प्रवेशाची संधी उपलब्‍ध असणार आहे. विद्यापीठातर्फे इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विविध विद्याशाखांचे शिक्षणक्रम उपलब्‍ध आहेत.

जिल्ह्यात व्‍यावसायिक शिक्षणक्रमांच्‍या उपलब्‍ध जागा अशा

अभ्यासक्रम महाविद्यालये प्रवेश क्षमता

बी.ई/बी.टेक. २० ७,४९८

बी. फार्म. २९ २,३००

फार्म. डी. २ ६०

डी. फार्म. ३५ २,१००

बी.आर्क. ३ २००

एचएमसीटी १ ६०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

Nagpur: पाण्याचे शिंतोडे उडाल्याच्या वादातून खून;कळमन्यातील घटना; दोन कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Satara Sangli Election: सातारा-सांगली निवडणुकीत मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजपला मित्रपक्षांची साथ मिळणार का?

SCROLL FOR NEXT