Black market rice and wheat seized by police in Deola. esakal
नाशिक

Nashik Crime: काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असलेले धान्य जप्त; देवळा पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : उमराणे (ता.देवळा) जवळील मुंबई आग्रा महामार्गावर शासकीय गोदामातील रेशनचा गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहन मुद्देमालासह पोलिसांना जप्त करत धान्याची वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईत देवळा पोलिसांनी सुमारे ११ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Grains going for sale in black market seized Deola police action Nashik Crime)

बुधवार (ता.१४) रोजी उमराणे (ता.देवळा) येथील मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक क्रमांक (एमएच १२ एफसी ५८४४) मध्ये ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा सुमारे २४६ गोणी (प्रत्येकी ५० किलोचा कट्टा) तांदूळ व ३७ हजार ५०० रुपये किमतीचे सुमारे ३० गोणी गहू (प्रत्येकी ५० किलो) याप्रमाणे शासकीय गोदामातील गहू व तांदूळ धान्य वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यावरुन देवळा पोलिसांनी गहू व तांदूळचा धान्यसाठा काळ्या बाजारात अवैध मार्गाने वाहतूक करीत संशयित यांच्या ताब्यातून ८ लाख रुपये किमतीचा मालट्रक असा एकूण ११ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याप्रकरणी देवळा येथील पुरवठा निरीक्षक ज्योती कपाले यांनी संशयित विजय देवरे (रा. उमराणे, मनमाड रोड) व ट्रकचालक योगेश माणिक भामरे (वय ३२ रा, खुंटेवाडी ता.देवळा) यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विक्रांत कचरे व सहकारी करीत आहेत .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT